समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, डिव्हायडरला आदळल्यानंतर कार पेटली; महिलेचा मृत्यू

कार डिव्हायडरला आदळल्यानंतर कारमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि त्यामुळे कारने पेट घेतला असे सांगण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाशिम:

मुंबई ते नागपूर हे अंतर वेगात पार करता यावे यासाठी बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही थांबलेली नाही. सोमवारी (11 नोव्हेंबर 2024) पहाटे या मार्गावर एक भीषण अपघात झाला ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की डिव्हायडरला कार आदळल्यानंतर कारने पेट घेतला आणि काही मिनिटांतच त्या कारचा कोळसा झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वाशिममधील कारंजा तालुक्यात लोहारा गावाजवळ हा अपघात झाला. एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे कळते आहे. ट्रकला ओव्हरटेक करत असताना कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातानंतर ही कार जळून खाक झाली. अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही कार महिला चालवत होती. अपघातात या चालक महिलेचा मृत्यू झाला आहे.

नक्की वाचा : माजी क्रिकेटपटू संजय बांगरचा मुलगा बनला मुलगी! ट्रान्सफॉर्मेशन VIDEO सोशल मीडियावर Viral

ही कार नागपूरवरून मुंबईकडे येत होती.  वाशिमच्या कारंजा तालुक्यातील लोहारा गावच्या हद्दीत चॅनल क्रमांक 200 जवळ या कारने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता.  ओव्हरटेक करतेवेळी महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरवर आदळली. कारची डिव्हायडरला बसलेली धडक इतकी जोरदार होती की कारचालक महिला कारमधून बाहेर फेकली गेली होती. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी पहाटे साडेतीन वाजल्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.  कार डिव्हायडरला आदळल्यानंतर कारमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि त्यामुळे कारने पेट घेतला असे सांगण्यात आले आहे.