Kalyan News: रसवंतीचा मालक ते चोर! ऑनलाईन रमीच्या नादानं त्याचं आयुष्यच बदललं

Online rummy addiction : नलाईन रमीच्या नादात चक्क दरोडेखोर बनलेल्या एका तरुणाला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Online rummy addiction : ल्याण जीआरपी पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
कल्याण:

Online rummy addiction : ऑनलाईन रमीचा नाद हा अनेक कुटुंबांना उद्धवस्त करणारा ठरला आहे. याबाबतची अनेक उदाहरण समोर आली आहेत. त्यानंतरही तरुणांमध्ये याचं व्यसन सुटत नाही. ऑनलाईन रमीच्या नादात चक्क दरोडेखोर बनलेल्या एका तरुणाला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश बानके असं या तरुणाचं नाव आहे. तो खर्डीमध्ये रसवंती गृह चालवत असे या संपूर्ण प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. 

काय आहे प्रकरण?

कल्याण कसारा स्टेशन दरम्यान गेल्या काही दिवसापासून धावत्या लोकल ट्रेनमधून महिला प्रवाशांचे महागडे दागिने हिसकावून  एक चोरटा पळून जात असल्याने रेल्वे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. खर्डी आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान या घटना घडल्या होत्या. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी या चोरट्याला शोधण्याकरीता दोन तपास पथके नेमली होती. चोरटा लोकल ट्रेनच्या उलटया दिशेने पळून जात असतानाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला होता. तपासा दरम्यान हा चोरटा खर्डीचा आहे. याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. 

( नक्की वाचा : Kalyan: खासगी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला परप्रांतीय तरुणाकडून हॉस्पिटलमध्येच बेदम मारहाण )

पोलिस पथक खर्डीला त्याच्या घरी पोहचले. सीसीटीव्हीत दिसणारा तरुण तोच होता. ऋषिकेश बेनके असे या चोरट्याचे नाव आहे. ऋषिकेश खर्डीमध्ये रसवंती गृह चालवितो. पावसाळा सुरु झाला. रसवंती गृहाचे दुकान बंद झाले.  मात्र त्याला ऑनलाइन रमी खेळण्याचा नाद असल्याने तो कर्जबाजारी झाला होता. एकीकडे दुकान बंद आणि दुसरीकडे रमी खेळण्याचा नाद त्यात कुटुंबाचा उदर निर्वाह करायचा कसा यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला होता. 

कल्याण जीआरपी पोलिसांनी ऋषिकेश बेनकेला बेड्या ठोकल्या आहे. ऋषिकेशने आणखी काही गुन्हे केले आहेत का ?  याचा तपास सुरु आहे. 


 

Topics mentioned in this article