मनोज सातवी, पालघर:
Palghar Crime News: वर्दीतील रक्षकच भक्षक बनल्याची संतापजनक घटना पालघरमधून समोर आली आहे. चौकशीसाठी बोलवलेल्या महिलेवर हवालदारानेच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या आवारात घडली आहे. शरद बोगाडे असं या हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यात महिला सुरक्षिततेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेवर कासा पोलीस ठाण्यातील हवालदार शरद बोगाडे याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला आहे.
Akola News : घरात लागली भीषण आग! सरकारी रुग्णावाहिका न पोहोचल्याने आजीबाईंचं 'आरोग्य' धोक्यात
चौकशीसाठी बोलावून महिलेवर अत्याचार
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलीस हवालदार बोगाडे याने लैंगिक अत्याचारासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी गुन्हा कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
त्याचबरोबर या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने दखल घेत कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची तडकाफडकी जिल्हा मुख्यालयात बदली केली आहे. तर पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्याकडे कासा पोलीस ठाण्याचा पदभर सोपावला आहे. तर आरोपी हवालदार बुगडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा >> Shocking News : कांद्यावर औषध फवारणीसाठी शेतात गेली, पती सोबत असतानाच महिलेचा जागीच मृत्यू! काय घडलं?