निलेश वाघ, प्रतिनिधी
Yevla Shocking News : येवला तालुक्यातील कातर येथे एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. औषध फवारणी करताना ब्लोर मशिनच्या पंख्यात केस अडकून एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. माधुरी दीपक सोनवणे (वय 27 वर्षे ) असं या महिलेचं नाव आहे. ब्लोर मशिनमध्ये केस अडकल्याने महिलेच्या डोक्याचा चक्काचूर झाला. मशिनला असलेल्या धारदार शस्त्रामुळे महिलेचं डोकं गंभीररित्या जखमी झालं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, ओधध फवारणी करताना माधुरी सोनावणे नावाच्या महिलेचं डोकं ब्लोर मशिनमध्ये अडकलं. त्यामुळे तिच्या डोक्यावरील सर्व केस त्या मशिनमध्ये अडकले आणि मशिनमध्ये असलेल्या धारदार शस्त्रामुळे डोक्यावर जखमा झाल्या. ही दुखापत इतकी भंयकर होती की, माधुरीने त्याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. माधुरीला ताताडीनं कोणत्याही प्रकारचा उपाचर न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
नक्की वाचा >> स्मृती मंधानाने इन्स्टाग्रामवर अपडेट केला नवा BIO, काय लिहिलंय? पलाशसोबतचे 'ते' फोटोही केले डिलीट
माधुरी तिच्या पतीसोबत शेतात गेली अन् घडलं भयंकर..
माधुरी तिच्या पतीसह कारणी येथे राहत होती. फक्त एक एकर शेतजमीन असलेले सोनवणे कुटुंबीय अल्पभूधारक आहेत. ते त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकाची लागवड करतात. बदलत्या हवामानामुळे कांद्यावर विविध रोगाचा फटका बसला आहे. त्यामुळे ती तिच्या पतीसह ब्लोअर मशिनच्या साहाय्याने कांदा पिकावर फवारणी करण्यासाठी शेतात गेली होती.
त्यावेळी मशिनमध्ये पाणी टाकत असताना, माधुरीचे केस अचानक त्या मशिनमध्ये अडकले. त्यानंतर तिचा डोकं मशिनमध्ये अडकलं आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती होती की, माधुरीचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> 'त्या पत्रावर शरद पवार गटाच्या कोणाचीच सही नाही', हिवाळी अधिवेशनापूर्वी CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world