'नकोशी'च्या नशीबी असलेलं दु:ख अद्यापही संपलेलं नसल्याचं दिसून येत आहे. सध्या मुलगा आणि मुलीमध्ये भेद केला जात नाही असं म्हटलं जात असलं तरी आजही मुलासाठी मुलीचा जीव घेणाऱ्या घटना संताप वाढवणाऱ्या आहेत.
NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पालघरच्या डहाणू शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या चिमुरडीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. ही महिला कोलकत्याहून डहाणुला आपल्या आई-वडिलांकडे आली होती. प्रसुतीसाठी ती आई-वडिलांकडे राहायला आली होती. यातच तिने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.
पुनम शहा हिला तीन मुली आहेत. आता झालेल्या प्रसुतीमध्ये तिला चौथीही मुलगीच झाली. यामुळे पुनम नैराश्यात गेल्याचं सांगितलं जात आहे. यातच तिने डहाणू उपजिल्हा रुग्णालयातच नवजात बाळाचं नाकतोंड दाबून जीव घेतला. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक करून तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Kalyan News: दिसायला सुंदर पण कारनामे भयंकर! कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर 'तिने' काय केलं?
आरोपी पूनम शहा हिचे सासर कोलकत्ता येथील असून, माहेर उत्तर प्रदेशात आहे. परंतु अनेक वर्षांपासून तिचे आई-वडील डहाणू शहरातील लोणीपाडा येथे राहत असल्याने ती प्रसूतीसाठी येथे आली होती. या प्रकरणी उप विभागीय पोलीस अधिकारी भागीरथी पवार अधिक तपास करीत आहेत.