अहमदनगरच्या आयुक्तांचं घर ACB कडून सील! आयुक्त जावळे फरार

Pankaj Jawale : छत्रपती संभाजीनगर एसीबीची कार्यालयाच्या जालना पथकाने मोठी कारवाई केली आहे. अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर एसीबीने ही कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ahmednagar Municipal Corporation (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर:


Pankaj Jawale : छत्रपती संभाजीनगर एसीबीची कार्यालयाच्या जालना पथकाने मोठी कारवाई केली आहे. अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर एसीबीने ही कारवाई केली आहे. बांधकाम परवानगी देण्यासाठी आयुक्त जावळे यांनी 8 लाखांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे जावळे यांनी आपल्या कार्यालयातील लिपिक देशपांडे नावाच्या व्यक्तीच्या मार्फत ही लाच मागितली होती. मात्र, संबंधित व्यक्तीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात तक्रार दिली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

अहमदनगरमध्ये एका कंपनीला कन्स्ट्रक्शन फर्मचे  बांधकाम करायचे असल्याने त्यांनी महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र या परवानगीसाठी मनपा आयुक्त जावळे यांनी आपल्या लिपिकामार्फत ललाच मागितली. तर लाच देण्याचं ठरल्यावर परवानगी देण्यासाठी संमती दर्शवली. मात्र संबंधित कंपनीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीच्या जालना युनिटकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची खात्री केली. 19 आणि 20 जून रोजी ही लाच मागण्यात आली होती. 

 जावळे यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यावर पथकाने कारवाईसाठी आज (गुरुवार, 27 जून) सापळा रचला होता. पण या कारवाईची कुणकुण लागतातच आयुक्त जावळे आणि त्यांचा लिपिक देशपांडे दोघेही महानगरपालिकेत आलेच नाही. याप्रकरणी आता एसीबीने पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

( नक्की वाचा : बाबा आमटेंचं आनंदवन हादरलं, बाथरूममध्ये 25 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं? )

आयुक्तांच्या घरावर छापा...

अहमदनगर मनपा आयुक्तांनीच लाच मागितल्याचा आरोप झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान एसीबीच्या पथकाने आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी छापा टाकत तपासणी देखील केल्याची माहिती मिळत आहे. सोबतच दुसरा संशयित आरोपी देशपांडेच्या घरी देखील छापा टाकत चौकशी केली जात आहे.

Topics mentioned in this article