Parbhani Crime: भावपूर्ण श्रद्धांजली बायको.. आधी स्टेटस नंतर निर्घृणपणे संपवलं, परभणीत खळबळ

आरोपी पतीने जवळपास 12 वेळेस हे वार केले आहेत, केलेले वार इतके खोलवर आहेत की जाग्यावरच पत्नीचा मृत्यू झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

परभणी: परभणी आधी पत्नीच्या फोटोसह भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवत तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली आहे.  परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. विद्या विजय राठोड (32) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विजय राठोड असं आरोपी पतीचे नाव आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील शेत शिवारात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विद्या विजय राठोड या 32 वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीने तीक्ष्ण हत्याराने छाती आणि पोटावर वार करत तिचा खून केल्याची घटना घडली आहे, आरोपी पतीने जवळपास 12 वेळेस हे वार केले आहेत, केलेले वार इतके खोलवर आहेत की जाग्यावरच पत्नीचा मृत्यू झाला आहे. 

Nagpur Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, अल्पवयीन मुलीने तरुणाला घरी बोलावलं, नराधमाने नको ते केलं

मयत महिलेचे मृत शव जिंतूर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले होते, डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले असून मयत महिलेला तिच्या पतीपासून दोन मुले असल्याची माहिती देखील सामोर आली आहे. आरोपी पती सध्या फरार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या घटनेचा तपास सध्या पोलीस करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा खून करण्याआधीच विजय राठोडने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर पत्नीचा फोटो आणि 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेटस ठेवले होते. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता, ज्यामुळे पत्नी विद्या माहेरी राहायला आली होती. आज (गुरुवार, 28 ऑगस्ट 2025) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विद्या तिच्या वडिलांच्या शेतात असताना विजय तेथे पोहोचला. तिथे दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. या वादातून संतापलेल्या विजयने आपल्या हातातील धारदार हत्याराने विद्याच्या छाती, पोट आणि पाठीवर 10 ते 12 वार केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Advertisement

Mumbai News: मुंबईत 'टक टक गँग' पुन्हा ॲक्टिव्ह, आत्ताच्या 'कार'नाम्याने पोलिसांचे टेन्शन वाढले

Topics mentioned in this article