महाराष्ट्र पुन्हा हादरला, ठाण्यातील नामांकित शाळेत 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; CCTV फुटेजमध्ये...

विद्येची देवता जिथं वास करते अशा शाळेमध्ये मुलगी असुरक्षित असल्याचं समोर आल्याने पालकांकडून आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Thane Crime : ठाणे जिल्ह्यातील बदलापुरमधील एका नामांकित शाळेत चौथीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने अख्खा महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती. विद्येची देवता जिथं वास करते अशा शाळेमध्ये मुलगी असुरक्षित असल्याचं समोर आल्याने पालकांकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान ठाण्यातून (Thane School) पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

ठाण्यातील चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीच्या पालकांनी एका अज्ञात व्यक्तिविरोधात मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

नक्की वाचा - Latur News: अल्पवयीन तरुणीला गुंगीचं औषध दिलं, दारुही पाजली, अत्याचार करतानाचा व्हिडीओ काढला, अन् पुढे...

या प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांकडून शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. 

Topics mentioned in this article