Crime News: गेम खेळता खेळता वाद, 19 वर्षीय तरुणाने मित्रालाच संपवलं, निर्दयीपणे मारहाण करत घेतला जीव!

Pimpri Chinchwad Crime:  गणेश नागनाथ कुऱ्हाडे असं खून करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. मुलाला रस्त्यावर खाली पाडून डोक्यावर व तोंडावर लाथा मारून त्याचा खून करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर परिसरात असलेल्या विजयप्रभा हौसिंग सोसायटी मध्ये बिझनेस नावाची गेम खेळताना झालेल्या वादातून एका 16 वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेम खेळता खेळता झालेल्या वादातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवडमधील नेहरुनगरमध्ये ही भयंकर घटना घडली. गणेश नागनाथ कुऱ्हाडे असं खून करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. मुलाला रस्त्यावर खाली पाडून डोक्यावर व तोंडावर लाथा मारून त्याचा खून करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुलाचे वडील नागनाथ कुऱ्हाडे यांनी संत तुकाराम नगर पोलिसांत फिर्याद दिली असून हबीब शेख या 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हबीब आणि फिर्यादी यांचा 14 वर्षीय दुसरा मुलगा कार्तिक हा मित्राच्या टेरेसवर बिझनेस नावाचा गेम खेळत होते.

ट्रेंडिंग बातमी - Rahul Gandhi: 'त्यावेळी मी नव्हतो, पण...', शिख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य

यावेळी या दोघांमध्ये वाद झाले ज्यानंतर आरोपी हबीबने कार्तिक यास मारहाण केली. हा वाद इतका वाढला की कार्तिकने त्याचा भाऊ गणेश यास बोलावले त्यानंतर गणेश आणि हबीब यांची सिमेंटच्या रस्त्यावर भांडणे झाली. यावेळी झालेल्या मारहाणीत गणेशला खाली पाडून डोक्यात आणि तोंडावर लाथा मारल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हबीब शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Advertisement

Gadchiroli News: हळदही सुकली नव्हती... नवरदेवाने नवरीच्या मांडीवर जीव सोडला, मन सुन्न करणारी घटना!