Pimpri Chinchwad Crime: शादी डॉटकॉमवर ओळख, CEO असल्याची बतावणी अन्... उच्चशिक्षित तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

फसवणूक झालेल्या महिलेकडून 81 बँक खात्यावर आरोपींनी पैसे घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: शादी डॉट कॉम या  वेबसाईटवरून मुलीच्या संपर्कात येऊन तिला लग्नाच आमिष दाखवून 3 करोड 16 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रणजीत मुन्नालाल यादव, सिकंदर मुन्ना खान आणि बबलू रघुवीर यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फसवणूक झालेल्या महिलेकडून 81 बँक खात्यावर आरोपींनी पैसे घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेली तरुणी शादी डॉट कॉम संकेतस्थळावरून विवाहासाठी मुलगा शोधत होती. तेव्हा आरोपीची आणि तिची ओळख झाली. परदेशात नामांकित कंपनीत सीईओ असल्याचं त्यानं सांगितलं. फसवणूक झालेल्या उच्चशिक्षित तरुणीचा देखील विश्वास बसला. त्यांचं व्हाट्सअप कॉल वरून दररोज बोलणं सुरू झालं. ते एकमेकांच्या अधिक जवळ आले.

दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचं ठरवलं होतं, त्यामुळेच याचा फायदा आरोपीने घेतला. आरोपीने आजारपणाचे आणि लोकांकडून घेतलेल्या कर्ज फेडीचे कारणे देऊन 2023 ते 2024 या  दरम्यान उच्चशिक्षित तरुणीकडून तब्बल ३ करोड 16 लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात समोर आल. हे करोडो रुपये आरोपीने वेगवेगळ्या 81 बँक खात्यावर घेतले होते. त्यापैकी 11 अकाउंट हे एकाच पत्त्यावर होते.

Accident News: पुणे- सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटली, 30 प्रवासी गंभीर जखमी, चालकाला डुलकी लागल्याने..

हे पैसे ज्या व्यक्तींच्या बँक खात्यात आले, त्या तिघांना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी दिल्ली हरियाणा बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघे तरुणीची फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या संपर्कात होते असं पोलीस तापासात समोर आला आहे. तरुणीची फसवणूक करणारा अज्ञात आरोपी आणि बेड्या ठोकण्यात आलेला रणजीत, सिकंदर आणि बबलू हे इंस्टाग्राम कॉल च्या माध्यमातून संपर्कात होते.  बबलू हा अज्ञात आरोपीच्या सांगण्यावरून एटीएम मधून पैसे काढून त्याला द्यायचा. या प्रकरणात आत्तापर्यंत 300 ते 400 बँक खात्याची पडताळणी करण्यात आलेली आहे.

Advertisement

Tatkal Ticket Booking Rule: रेल्वेतिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! केवळ 'याच' लोकांना मिळणार तत्काळ तिकीट; काय आहे नवा नियम?