Pune Crime : 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग प्रकरण : गुगलवरही सर्च केलं, सोसायटीतील तरुणाला अटक

पुण्यातील सोसायटीमधील 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आला होत्या. यात 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला होता.

जाहिरात
Read Time: 1 min

भटक्या कुत्र्यांवरील मारहाणीच्या घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा सोसायटींमध्ये खाद्यपदार्थ देण्यावरुनही वाद झाल्याचं पाहायला मिळतं. पुण्यातून 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग केल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पिंपरी चिंचवड शहरातील महिंद्रा अँथिया सोसायटीमध्ये 13 एप्रिल रोजी भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करून ठार मारल्या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी सोसायटीमधील सदस्य अलौकिक राजू कोटे याला ताब्यात घेतलं आहे. अलौकिक नावाच्या तरुणाने भटक्या कुत्र्यांची निर्दयीपणे हत्या केली. 

नक्की वाचा - Solapur Crime: बसस्थानकातून 3 वर्षीय मुलीचे अपहरण, पोलिसांनी चक्रे फिरवली, 5 तासांनी सुखरुप सुटका

या सोसायटीमधील 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आला होत्या. यात 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी अलौकिक पहाटेच्या सुमारास आपली चारचाकी सोसायटीच्या आवारामध्ये 4 ते 5 वेळा फिरवताना दिसून आला आहे.  त्याच्या मागे काही भटकी कुत्रे धावतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. अलौकिकच्या मोबाइलमध्ये सुद्धा विषयप्रयोग करण्यासंबंधित गुगलवर सर्च केल्याचं दिसून आलं आहे. मुक्या प्राण्यावर हा विषप्रयोग का करण्यात आला याबाबत माहिती समोर आलेली नाही. तरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article