Pimpri Chinchwad: मुलीला सांभाळा, मला भट्टीमध्ये जाळा... व्हिडिओ करत रिक्षा चालकाने आयुष्य संपवलं

मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आव्हान करत त्याने आयुष्य संपवलं

जाहिरात
Read Time: 2 mins

पिंपरी चिंचवड: सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली.  राजू नारायण राजभर असे आयुष्य संपवलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येआधी त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तसेच चिठ्ठी लिहीत चार जणांच्या त्रासाला कंटाळून मी जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आव्हान करत राजू नारायण राजभर या तरुणाने चिंचवड येथील साईनगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे. असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहत राजू राजभर या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

मला मारायच्या धमक्या येत होत्या, तुझ्या मुलांना उचलू, असे आरोपी म्हणत होते. मला घरातून किंवा बाहेरुन कोणताही सपोर्ट मिळाला नाही, त्यामुळेच मी हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे या रिक्षा चालकाने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मी माझ्या बायकोची, माझ्या मुलीची क्षमा मागतो, असंही तो या व्हिडिओमध्ये म्हणतो. 

Advertisement

HMPV : चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या व्हायरसची एन्ट्री? हॉस्पिटलमध्ये रांगा, वाचा लक्षणं आणि उपाय )

'माझ्या छोट्या मुलीला सांभाळा, माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा असं अत्यंत भावनिक आव्हान देखील राजू राजभर या तरुणाने केला आहे. आता या प्रकरणात निगडी पोलिसांनी रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.