Pimpri Chinchwad News: शांत बस म्हटल्याचा राग, दारूड्या मित्राच्या भावाने डोक्यात घातला दगड; तरुण जखमी

Pimpri Chinchwad News: दारूड्या मित्राचा तरुणांवर हल्ला, घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहर हादरलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Pimpri Chinchwad News: दारूड्या तरुणाचा मित्रावर हल्ला"
प्रतिकात्मक फोटो (Canva)

Pimpri Chinchwad News: पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण होतोय. शाळकरी विद्यार्थ्यांमधील गँगवॉरपासून ते मोठ्या लोकांमध्ये होणाऱ्या किरकोळ वादातून घडणारे मोठ्या गुन्ह्यांमुळे शहर हादरतंय. नुकतेच पिंपरीमध्ये अशीच काहीशी घटना घडलीय. दारूच्या नशेत आरडाओरडा करणाऱ्या मित्राला शांत राहण्यास सांगितलं म्हणून रागाच्या भरात त्याने मित्रालाच बेदम मारहाण केलीय. या मारहाणीत संबंधित तरुण जखमी झालाय. 

नेमके काय घडलं?

आरडाओरडा करणाऱ्या दारूड्या मित्राला केवळ शांत बस असं सांगितलं म्हणून तरुणाला पंच आणि दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. 23 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास निगडीतील यमुनानगर येथील बालाजी ग्राउंडजवळ ही घटना घडलीय. रोहित चव्हाण (वय 24 वर्ष) असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. रोहितने निगडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात तक्रार दाखल केलीय. रोहितच्या तक्रारीनुसार पृथ्वी गायकवाड आणि यश गायकवाड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

(नक्की वाचा: Pune News: पुणे हादरले! पीजीत राहणाऱ्या मद्यधुंद तरुणीवर मालकाची घाणेरडी नजर, पुढे घडला अतिशय संतापजनक प्रकार)

अन् मित्राच्या डोक्यात घातला दगड

रोहितचा मित्र पृथ्वी गायकवाड दारू पिऊन आरडाओरडा करत होता म्हणून रोहितने त्याला शांत बसण्यास सांगितले. याचाच राग आल्याने पृथ्वी गायकवाडने खिशातील पंचच्या मदतीने रोहितच्या डोक्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर शिवीगाळ करत त्याला ओढत ग्राउंडच्या बाहेर आणले. तिथे पृथ्वीचा भाऊ यशनं देखील जमिनीवर पडलेला दगड उचलून रोहितच्या डोक्यात घातला, या घटनेत तो जखमी झालाय.

Advertisement

(नक्की वाचा: Navi Mumbai: नवी मुंबई हादरली! बालदिनीच 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचा छळ, शिक्षकानं 5-6 वेळा थोबाडीत मारायला लावलं, अन्..)

दरम्यान या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ उडालीय. 

Topics mentioned in this article