बांगलादेशातील हिंसाचार, भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशींची टरकली

गेल्या सहा महिन्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी जवळपास 20 बांगलादेशी घुसखोर नागरिकांना अटक केलीय

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

सूरज कसबे

बांगलादेशामध्ये सुरू असलेले हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस अलर्ट झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.  बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी करून भारतात आलेले बांगलादेशी नागरीक देशाच्या विविध भागात वास्तव्य करत असतात.या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करू नये यासाठी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती. बांगलादेशातील हिंसाचारानंतर इथले पोलीस अधिकच सतर्क झाले आहेत. 

गेल्या सहा महिन्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी जवळपास 20 बांगलादेशी घुसखोर नागरिकांना अटक केलीय.  यापुढे ही कारवाई आणखी जोरात केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.  पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पिंपरी चिंचवड पोलिसांची स्पेशल ब्रांच, गुप्तचर खाते नजर ठेवून आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ही माहिती दिली आहे. ज्या घरमालकांकडे हे बांगलादेशी वास्तव्यास असतील त्यांचीही  चौकशी करण्यात येणार आहे. साबाबतच्या सूचना पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Advertisement

कॅन्सरच्या उपचारासाठी भारतात आलेली बांगलादेशी महिला अडकली

बांगलादेशमध्ये उसळलेला हिंसाचार, शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडावे लागणे यामुळे तिथली परिस्थिती ही चिंताजनक झाली आहे. आंदोलकांनी पंतप्रधान निवासाची तोडफोड केली आमि पंतप्रधान निवासात घुसत आतल्या वस्तूंची लुटालूट केली होती. या सगळ्या परिस्थितीमुळे बांगलादेशातून भारतात आलेली कॅन्सर पीडीत महिला अडकली आहे. प्रोवा रानी असं या महिलेचं नाव असून ती तमिळनाडूमध्ये उपचारासाठी आली होती. प्रोवा देवी आणि तिचा नवरा हे विमानतळावरच बसून आहेत. बांगलादेशला जाणारी विमाने एकामागोमाग एक रद्द होत असल्याने इथे बसून राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये. गुजरातमध्येही काही बांगलादेशी विद्यार्थी अडकल्याचे वृत्त आहे. गुजरात विद्यापीटात शिकायला आलेले 20 बांगलादेशी विद्यार्थी हे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. बांगलादेशात 19 हजार भारतीय नागरीक परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी बांगलादेशात 19000 भारतीय असल्याचे सांगितले आहे. यातले 9000 हे विद्यार्थी आहेत. या सगळ्यांशी भारतीय सरकार संपर्कात आहेत असं भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले आहे. 

Advertisement