दादरमधील मॅकडोनाल्ड उडवण्याचा प्लान? 'त्या' कॉलनंतर मुंबई पोलीस अलर्टवर 

मुंबई पोलिसांना दादरमधील मॅकडोनाल्ड उडवण्याचा कट असल्याचा कॉल मुंबई पोलिसांना आल्यानंतर मुंबईत खळबळ उडाली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

मुंबई पोलिसांना दादरमधील मॅकडोनाल्ड उडवण्याचा कट असल्याचा कॉल मुंबई पोलिसांना आल्यानंतर मुंबईत खळबळ उडाली आहे. शिवसेनाभवनापासून काही अंतरावर असलेलं दादरमधील मॅकडोनाल्डमध्ये स्फोट घडवून आणण्याचा प्लान असल्याची माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्याप तरी त्यांना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आलेले नाहीत. 

एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांना एक कॉल आला होता. त्यानुसार ही व्यक्ती बसमधून प्रवास करीत असताना तिने दोघांचं संभाषण ऐकलं. यामध्ये ते दादरमध्ये मॅकडोनाल्डमध्ये स्फोट घडवून आणण्याबद्दल बोलत होते. त्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत तपास सुरू केला. अद्याप तरी त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. तरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.  
 

बातमी अपडेट होत आहे.