जाहिरात

Dombivli News : मित्रांचे 36 लाख लुबाडले, पत्नीच्या एका कॉलमुळे सगळा खेळ खल्लास, आशिष पवारला 1 वर्षानंतर अटक

ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली मित्रांची 36 लाखांची फसवणूक करून फरार झालेल्या तरुणाला अखेर एका वर्षानंतर अटक करण्यात आली आहे.

Dombivli News : मित्रांचे 36 लाख लुबाडले, पत्नीच्या एका कॉलमुळे सगळा खेळ खल्लास, आशिष पवारला 1 वर्षानंतर अटक
Dombivli Money Fraud Case

Dombivli Crime News Today : ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली मित्रांची 36 लाखांची फसवणूक करून फरार झालेल्या तरुणाला अखेर एका वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. पत्नीला कॉल केल्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं. आशिष पवार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली परिसरात राहणाऱ्या आशिष पवारने त्याच्या तीन मित्रांना ट्रान्सपोर्ट व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्याने मित्रांकडून तब्बल 36 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला.त्यानंतर त्याच्या पत्नीने पती हरवल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाणे येथे दाखल केली होती.

नक्की वाचा >> Pune News: अख्ख्या महाराष्ट्रात संतापाची लाट, नसरापूरमध्ये चिमुकलीसोबत काय काय घडलं? 22 तासांचा घटनाक्रम समोर

मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं आणि..

तपासादरम्यान अशी धक्कादायक बाब समोर आली की,आशिष पवार हा फरार असतानाही त्याच्या पत्नीच्या सतत संपर्कात होता.मित्रांचे पैसे परत कसे करायचे, या भीतीपोटी तो पळून गेला होता.पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचं मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं.आशिष अक्कलकोट येथे एका कंपनीत काम करत असल्याचे उघडकीस आले.त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी आशिष पवार याच्याविरुद्ध एक वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. 

नक्की वाचा >> Ulhasnagar News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील तरुणाच्या पोटात 5 जणांनी चाकू खुपसला, उल्हासनगरात घडलं असं काही..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com