जाहिरात

Ulhasnagar News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील तरुणाच्या पोटात 5 जणांनी चाकू खुपसला, उल्हासनगरात घडलं असं काही..

उल्हासनगर शहरात धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 21 वर्षीय तरुणावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Ulhasnagar News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील तरुणाच्या पोटात 5 जणांनी चाकू खुपसला, उल्हासनगरात घडलं असं काही..
Ulhasnagar Knife Attack News

Ulhasnagar Crime News Today :  उल्हासनगर शहरात धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 21 वर्षीय तरुणावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गणेश वाघे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात राहणारा गणेश वाघे कॅम्प 5 मधील नेताजी चौक परिसरात गेला असताना केक शॉपसमोर ही घटना घडली. 

गणेश वाघे रस्त्यावरच कोसळला अन्..

हल्लेखोरांनी गणेशच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर गणेश वाघे हा रस्त्यावरच कोसळला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नक्की वाचा >> Badlapur News: बदलापूर नगरपरिषदेच्या 'या' अधिकाऱ्याविरोधात गुन्हा, आणखी काही आधिकारी अडकणार, प्रकरण काय?

परिसरात भीतीचे वातावरण

दरम्यान,या घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

नक्की वाचा >> Sambhajinagar News: सहलीला जाणाऱ्या 9 मित्रांसोबत नको ते घडलं, 3 जणांचा करुण अंत, 6 जण कसेबसे वाचले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com