Ulhasnagar Crime: 'मी इथला भाई..',गरब्यात केला गोळीबार,शिवसेना नेत्यावरही बंदूक ताणली..पण पोलिसांनी जे केलं..

Ulhasnagar Firing Case Latest Update : उल्हासनगरमध्ये मागील काही महिन्यांमध्ये भाईगिरी करून गुन्हेगारी करणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातल्याचं, अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ulhasnagar Firing Case
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Ulhasnagar Firing Case Latest Update : उल्हासनगरमध्ये मागील काही महिन्यांमध्ये भाईगिरी करून गुन्हेगारी करणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातल्याचं, अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं होतं. भरदिवसा चाकूने हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा ट्रेंडच काही गुंड लोकांनी या परिसरात सुरु केला होता. आताही उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. उल्हासनगरमध्ये कॅम्प क्रमांक 2 मध्ये बंजारा विकास परिषदेच्यावतीने गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गोळीबाराची भयंकर घटना घडली होती.पंरतु, याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दहशत निर्माण करणारे सराईत गुंड सोहम पवार आणि त्याचे वडील अनिल पवार यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तसच आरोपींकडे असलेलं पिस्तूलही पोलिसांनी जप्त केलं.

'मी इथला भाई..', आरोपीने हवेत गोळी झाडली अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, गरबा कार्यक्रमादरम्यान आरोपी सोहम पवारने लोकांना दम भरला. मी इकडचा भाई आहे, असं म्हणत सोहमने हवेत गोळ्या झाडल्या. या गंभीर गुन्ह्यात सोहमचे वडील अनिल पवारनेही त्याला साथ दिली आणि परिसरात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही आरोपींनी शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्यावर थेट बंदूक ताणून दहशत पसरवली होती.

नक्की वाचा >> 'मला रडू कोसळलं..घरात सुखाचा घास सुद्धा तोंडात गेला नाही', पंकजा मुंडेंनी भगवानगडावर सांगितला 'तो' किस्सा

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. याप्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बुधवारी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये आरोपी पिता पुत्राला पोलिसांनी अटक केली. 

उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गतची ही घटना आहे. काल रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे. गरबा खेळण्यासाठी आपण कुणाची परवानगी घेतली,यावरून आरोपी आणि फिर्यादीचे वादविवाद होते. हवेत त्यांनी एक राऊंड फायर केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यासोबत त्याचे वडीलही होते. दोन्ही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता संबंधीतांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याविषयी सविस्तर तपास उल्हासनगरचे अधिकारी करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

Advertisement

नक्की वाचा >> Car Accident Video: हायवेवर 'ती' एकच चूक नडली, अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू!