Kolhapur News : कोल्हापुरात संतापाची लाट! प्राध्यापकाने कॉलेजच्या विद्यार्थीनीला केबिनमध्ये बोलावलं अन्..

Kolhapur News Today : कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kolhapur Crime News Today

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Kolhapur Crime News : कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गोकुळ शिरगाव येथील नामांकित केआयटी (KIT) महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित प्राध्यापकाला ताब्यात घेतले आहे.सौरभ जोशी असं अटक केलेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात के आय टी महाविद्यालयातील प्राध्यापक सौरभ जोशी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सौरभ जोशी विनयभंग करत असल्याची तक्रार महाविद्यालयातीलच एका विद्यार्थिनीने पोलिसांकडे केली होती.या तक्रारीनंतर पोलिसांनी जोशी यांना ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थीनीला केबिनमध्ये बोलावून अश्लील वर्तन करत असल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.विद्यार्थीनीने दिलेल्या या तक्रारीनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. 

नक्की वाचा >> Ajit Pawar Death: अजित पवारांच्या अपघात किंवा घातपाताला कोण कारणीभूत? रोहित पवारांनी ट्वीटरवर नावंच जाहीर केलं

नेमकं काय घडलं?

पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी जोशी या प्राध्यापकाने पीडित विद्यार्थिनीला काही शैक्षणिक कामाच्या निमित्ताने आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले होतं.दोन ते तीनवेळा बोलावून घेतल्यानंतर तब्येत आणि घरची विचारपूस केलेली.जोशीने तरुणीला काही अडचण वाटली तर मोबाईल नंबर देऊन सहकार्य करेन असं आश्वासन दिलं होतं. आरोपीने एकेदिवशी तरुणीसोबत जवळीकता साधण्याचा प्रयत्न केा होता. त्यावेळी तरुणी चिडून केबिनमधून बाहेर पडली. याच रागातून तरुणीने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर आरोपी जोशीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नक्की वाचा >> Badlapur News: बदलापूरमध्ये भयंकर घटना! तरुणाचा आईवर जीवघेणा हल्ला, पत्नीच्या रेकॉर्डिंगचं कनेक्शन आलं समोर

पीडित मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित 

आरोपी प्राध्यापकाने इतर काही मुलींशी अशाच प्रकारचं वर्तन केल्याचं तक्ररीत म्हटलंय.त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने या प्राध्यापकाच्या विरोधात कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.मुलींच्या बाबतीत घडलेल्या प्रकरामुळे सौरभ जोशीला निलंबित करण्यात आलंय. तसेच केआयटी कॉलेजमधील घडलेली घटना ही खेदजनक असल्याचं संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी म्हटलं आहे.  

Advertisement