जाहिरात

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या अपघात किंवा घातपाताला कोण कारणीभूत? रोहित पवारांनी ट्वीटरवर नावंच जाहीर केलं

रोहित पवारांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत केलेल्या नव्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या अपघात किंवा घातपाताला कोण कारणीभूत? रोहित पवारांनी ट्वीटरवर नावंच जाहीर केलं
Rohit Pawar Tweet On Ajit Pawar Plane Crash

Rohit Pawar latest Tweet : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे. भाजप युवा मोर्चाने या अपघाताचा थेट संबंध रोहित पवार यांच्या साखर कारखान्याशी जोडला आहे. या साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे दृश्यमानता कमी होऊन हा अपघात झाला का?असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आलीय. अशातच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून रोहित पवार यांच्या नव्या ट्वीटचीही चर्चा रंगली आहे. 

रोहित पवार एक्सवर (Twitter) काय म्हणाले? 

रोहित पवारांनी एक्सवर म्हटलंय की, "Mr.प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की,अजितदादांच्या अपघाताला/घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं..तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात,हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा.."

नक्की वाचा >> Badlapur News: बदलापूरमध्ये भयंकर घटना! तरुणाचा आईवर जीवघेणा हल्ला, पत्नीच्या रेकॉर्डिंगचं कनेक्शन आलं समोर

वैभव सोलनकर यांचा रोहित पवारांवर निशाणा

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सुरु असतानाच भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर रोहित पवारांवरच निशाणा साधला. अजितदादांच्या अपघाताचा थेट संबंध रोहित पवार यांच्या साखर कारखान्याशी जोडून सोलनकरांनी मोठी खळबळ उडवली. साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे दृष्यमानता कमी झाली आणि हा अपघात घडला असावा, असं म्हणत त्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. 

नक्की वाचा >> Raigad News: लग्नात बस्ता, हळदीला मटण आणि दारू बंद! रायगडच्या 'या' गावातील महिला मंडळाचा क्रांतिकारी निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com