असंवेदनशील प्रशासन! रुग्णवाहिका नाही; मृत अर्भक प्लास्टिकच्या पिशवीतून एसटीने आणलं घरी

रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचं बाळ पोटातच दगावलं. मृत अर्भकाला आणण्यासाठीही रुग्णवाहिका न मिळाल्याने कुटुंबाने प्लास्टिकच्या पिशवीत भरून एसटीने घर गाठलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे भयाण वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. नाशिक शहरापासून अवघ्या  काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोखाडामध्ये एक अत्यंत असंवेदनशील प्रकार घडला आहे. या भागातील आदिवासी समाज आजही मूलभूत सुविधांपासून दुर्लक्षित राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोखाडा येथील एका गर्भवतीला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने आणि उपचार न मिळाल्याने शेवटी आपलं बाळ जन्माला येण्या अगोदरच गमावावं लागलं. अविता सखाराम कवर (26) असं या दुर्दैवी मातेचे नाव आहे.

Advertisement

नक्की वाचा - Ghatkopar station : घाटकोपर स्टेशन प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला प्रवासी, पुढे काय घडलं?

यामध्ये आणखी एक अनास्थेचा कळस म्हणजे मृत अर्भक घरी नेण्यासाठी देखील रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर मृत अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन नाशिकपासून मोखाडा एसटीने प्रवास करून गाव गाठाण्याची वेळ या कवर कुटुंबावर आली. उपचारासाठी या मातेला घरापासून, खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथून मोखाडा ग्रामीण रुग्णालय आणि तेथून पुन्हा नाशिक जिल्हा रुग्णालय अशी भटकंती करावी लागली. तर, रुग्णवाहिका आणि उपचार मिळत नसल्याने जाब विचारल्याने रुग्णाच्या पतीला पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप देखील पीडित कुटुंबाने केला आहे. 
 
त्यामुळे ढिसाळ आरोग्य व्यवस्था आणि असंवेदनशील प्रशासनामुळे या मातेला आपलं बाळ गमवावं लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world