Pune News: 7 लाख खंडणी प्रकरणात पुण्यातील रील स्टार महिला पोलीस सोनाली हिंगेला मोठा दणका, सहकाऱ्यांनाही..

पुण्यातील पोलीस दलातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून “रील स्टार” म्हणून ओळखली जाणारी पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे आणि तिच्या दोन साथीदार पोलिसांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Reel Star Police Sonali Hinge Suspended
Pune:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune Extortion Case latest Update : पुण्यातील पोलीस दलातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून “रील स्टार” म्हणून ओळखली जाणारी पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे आणि तिच्या दोन साथीदार पोलिसांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून तब्बल सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे (सध्या सायबर पोलीस ठाणे),पोलीस शिपाई सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी तिघांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहणार आहे.

Advertisement

विद्यार्थिनीने मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली अन्..

या प्रकरणाची सुरुवात महाविद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कागदपत्रांपासून झाली.संबंधित विद्यार्थिनीने मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली होती.मात्र,या प्रकरणाचा गैरफायदा घेत तिन्ही पोलिसांनी विद्यार्थिनीला सोबत घेऊन थेट प्राचार्यांना जाब विचारला.त्यानंतर विद्यार्थिनीच्या माध्यमातून प्राचार्यांवर छळाचा आरोप करण्यास भाग पाडण्यात आले.

नक्की वाचा >> Pune News:  पुणे मेट्रो बोगदा भगदाड प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, घरमालक आणि बोअरवेल ठेकेदाराला दणका

तक्रारीचा धाक दाखवत या तिघांनी प्राचार्यांना पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि दहा लाखांची मागणी केली.भीतीपोटी प्राचार्यांनी सात लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.नंतर ही रक्कम तिघांनी आपसात वाटून घेतल्याचेही निष्पन्न झाले.

दरम्यान,विद्यार्थिनीने धैर्य दाखवत संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला आणि पोलिसांकडे खरी माहिती दिली.त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि बंड गार्डन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.