Puja Khedkar : पूजा खेडकरचा खेळ खल्लास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Puja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरवर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

Puja Khedkar :  वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरवर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे. त्यांना सरकारी सेवेतून बरखास्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यापूर्वी संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीनं (UPSC) पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करत तिच्या विरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला होता. या निर्णयाच्या विरोधात पूजा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केल्यानंतर अपात्र ठरवण्याचा कोणताही अधिकारी यूपीएससीला नाही. फक्त केंद्रीय कर्मिक (DoPT) मंत्रालयच मला अपात्र ठरवू शकते, असा दावा पूजा खेडकर यांनी  दिल्ली उच्च न्यायालयात केला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं ही कारवाई करत त्यांना मोठा धक्का दिला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहेत आरोप?

पूजा खेडकरांविरोधात जाणीवपूर्वक खोटी माहिती देणे, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन करणे हे आरोप होते. त्याचबरोबर पूजाने तब्बल बारा वेळा नावं बदलून परीक्षा दिली. मसुरीतही गैरवर्तणुकीचे आठ मेमो मिळाले होते.  इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नऊ वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी 12 वेळा परीक्षा दिली.  परीक्षा देताना स्वतःचे वडील आणि आईचे नाव बदलले. 2022 साली ओबीसी प्रवर्गातून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा लाभ घेतला. वडील सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात वर्ग 1 अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वर्षाला केवळ 8 लाखांपेक्षा कमी नव्हते, असा ठपका यूपीएससीनं ठेवला आहे. 

( नक्की वाचा : Puja Khedkar : 'मला अपात्र ठरवण्याचा UPSC ला अधिकार नाही,' पूजा खेडकरांचं कोर्टात उत्तर )
 

पूजानं फेटाळले होते आरोप

'मी दिव्यांग श्रेणीमध्ये दिलेल्या UPSC परीक्षांनाच योग्य मानावं,' असा दावा पूजानं केला आहे. पूजा खेडकर यांनी एकूण 12 वेळा ही परीक्षा दिली आहे. त्यापैकी फक्त दिव्यांग श्रेणीतून दिलेल्या परीक्षांनाच योग्य मानावं अशी याचिका पूजा यांनी केली आहे. त्याचबरोबर आपण नाव किंवा आडनाव बदललं नसल्याचा दावाही पूजानं केला होता. पण, केंद्र सरकारनं हे सर्व दावे फेटाळलत पूजाला सरकारी सेवेतून बडतर्फ केलं आहे.