Pune News : पुण्यातून अत्यंत हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील दिघी भागात राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थी अथर्व विजय देशमुख याने गळफास घेत स्वत:चा जीव घेतला आहे. या घटनेनंतर अनेकांना धक्का बसला आहे.
स्वयंपाकघरात सीट बेल्टच्या मदतीने घेतला गळफास
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व आपल्या आईसग गंगोत्री रुग्णालयाजवळ भाड्याच्या घरात राहत होता. तर त्याचे वडील विश्रांतवाडी परिसरात राहत होते. रविवारी १५ मार्च रोजी साधारण सायंकाळी ७.३० वाजता त्याची आई कामानिमित्ताने घराबाहेर गेली होती, त्यादरम्यान अथर्वने स्वयंपाकघरात सील बेल्टच्या साहाय्याने घळफास घेतला.
काही वेळानंतर जेव्हा अथर्वची आई घरी परतली तर दार आतून बंद होतं. अनेकदा आवाज देऊनही आतून काहीच उत्तर आलं नाही. तर त्यांनी शेजारच्यांची मदत घेतली. एक तरुण खिडकीतून आत गेला आणि त्याने दार उघडलं. आई घरात शिरली तर स्वयंपाकघरात अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. हे दृश्य पाहून आई बेशुद्ध झाली. या घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ अथर्वला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
आत्महत्येपूर्वी मोबाइल केला फॉरमॅट...
तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी अथर्वने आपला मोबाइल पूर्णपणे फॉरमॅट केला होता. ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अथर्वने असं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व वाघोलीतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चं शिक्षण घेत होता. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि त्याचे आई-वडील धक्क्यात आहेत. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे आणि आत्महत्येमागील कारण सापडण्याचा शोध घेत आहेत.
हेल्पलाइन
वांद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ - ९९९९६६६५५५ किंवा help@vandrevalafoundation.com
TISS iCall ०२२-२५५२११११ (सोमवार ते शनिवार - सकाळी ८:०० ते रात्री १०:०० पर्यंत उपलब्ध)
(जर तुम्हाला मदतीची गरज असेल किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला मदतीची गरज असेल, तर कृपया तुमच्या जवळच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञाशी संपर्क साधा.)