अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Prant Officer Bribe Case News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रांत कार्यालयात मोठी कारवाई करण्यात आली असून प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मोठी कारवाई केली. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी खैरनार यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
नक्की वाचा >> Chandrapur News: बाप पोलीस, मुलगी पोलीस अन् तिचा प्रियकरही पोलीस..प्रेमाला विरोध, चंद्रपुरात मोठं हत्याकांड!
अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडलं
संबंधित कामासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केली. ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान,थेट प्रांत अधिकारीच लाच प्रकरणात अटकेत सापडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.