जॅकेट, हातात पांढरा रुमाल; अखेर आरोपीची ओळख पटली! बोपदेव प्रकरणात महत्त्वाची घडामोड

पीडितेने आरोपीची ओळख पटवली आहे. या आरोपींचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार (Bopdev Ghat gang rape in Pune) प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पीडितेने आरोपीची ओळख पटवली आहे. या आरोपींचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीने जॅकेट घातलं असून हातात पांढरा रुमाल आहे. हा तरुण बिअर पित असताना दिसत आहे. त्याला अटक (Pune Crime News) करण्यात आली असून पीडित मुलीने या तरुणाची ओळख पटवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली व्यक्ती मध्यप्रदेशातील जबलपूरची आहे. चार वर्षांपूर्वी तो उपजीविकेसाठी पुण्यात आला होता. तेव्हापासून तो उंड्री येथील कडनगर येथे राहत होता.

त्या रात्री नेमकं काय घडलं? 
ही 21 वर्षीय तरूणी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. पुण्यातील बोपदेव घाटात हे दोघेजण रात्री 11 वाजता गेले होते. तो सर्व परिसर निर्मनुष्य होता.  तिथं जवळपास कोणीच नव्हतं. त्याचाच गैरफायदा घेत तीन अज्ञान आरोपींनी या दोघांनाही दमदाटी केली. त्यांना भीती दाखवली आणि त्यानंतर तिघांनीही तरूणीवर अत्याचार केले. त्यानंतर तिघेही तिथून पसार झाले. या घटनेनंतर पीडित तरूणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्राईम ब्रँच आणि कोंढवा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

नक्की वाचा - पोलिसांकडून 10 लाखांचं बक्षीस; 3 दिवसांनंतर पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणात मोठी अपडेट

आरोपींची माहिती देणाऱ्याला दहा लाखांचं बक्षीस केलं होतं जाहीर...
पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे. दरम्यान या प्रकरणात पुण्यातील बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांचीही चौकशी करण्यात आली आहे.
 

Advertisement