रेवती हिंगवे, प्रतिनिधी
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील बाणेर परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. बाणेर परिसरात 24 थाय स्पा नावाने एक सेंटर सुरू होतं. प्रथमदर्शनी येथे थाय स्पा सुरू असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली बाप-लेकाने सेक्स रॅकेटचा धंदा चालवत होते, हे समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
केवळ एकच नाही तर बाणेर परिसरातील एकूण चार स्पा सेंटरला पोलिसांनी टाळं ठोकलं आहे. बाणेर येथे स्पा च्या नावाखाली चालणारे हाई प्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या स्पा चालक, मॅनेजरसह जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Crime News : दोन तरुणांनी भररस्त्यात अडवून 18 वर्षीय तरुणीला संपवलं, घटना CCTV मध्ये कैद
पुण्यातील स्पा सेंटरची झाडाझडती...
सध्या राज्यात स्पा सेंटरची संख्या वाढत आहे. येथे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासाठी विविध प्रकारचे स्पा दिले जातात. मात्र काही ठिकाणी स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून सध्या स्पा सेंटरची झाडाझडती घेतली जात आहे. बाणेर परिसरातील अनेक स्पा सेंटरची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे अनेकदा बनावट ग्राहक पाठवून बाणेर पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई केली आहे.
दोघांना अटक..
पुण्यातील बाणेर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आगे. सिराज चौधरी आणि वसीम चौधरी असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना अटक करत जागा मालकांसह एका महिलेवर देखील बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.