Pune Crime : चिनी नागरिकाशी हातमिळवणी करीत आखला गुन्ह्याचा प्लान, पुण्यातील चित्रपट निर्मात्याला अटक 

कथित निर्मात्याने आतापर्यंत 86 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Pune Crime News : चिनी नागरिकांच्या सांगण्यावरून बँक खाते उघडून सायबर फसवणूक करण्यास मदत करणाऱ्या पुण्यातील एका कथित चित्रपट निर्मात्यास पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या कथित निर्मात्याने आतापर्यंत 86 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्याच्याकडून काही कागदपत्रे देखील ताब्यात घेतली आहेत. शिवम बाळकृष्ण संवतसरकार अस अटक करण्यात आलेल्या आरोपी निर्मात्याचे नाव आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. 

नक्की वाचा - Online Game : ऑनलाईन गेमच्या नादात वसईत मुलानं केली आईची हत्या, बापानं दिली साथ! असं समजलं सत्य

शिवम संवतसरकार याने चीन देशातील बॉम्बिनी या नागरिकाशी थेट संपर्कात राहून बालाजी इंटरप्राइजेस या नावाने बँक खाते सुरू केले होते. या बँक खात्याचा उपयोग तो फसवणुकीच्या गुन्ह्यात वापरले आहेत. या खात्यावर आतापर्यंत 86 लाख 43 हजार 111 रुपये जमा झाल्याचं समोर आलं असून या बँक खात्यासंदर्भात 15 पेक्षा अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीकडे आणखी दोन बँक खाती त्याच्या मोबाईलमध्ये असल्याचं समोर आलं असून पोलिसांनी दोन मोबाइल फोन देखील जप्त केले आहेत, अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article