
पुणे बंगळुरू महामार्गावरील कराडजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन मैत्रिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोघीजणी मलकापूरहून वाठारच्या दिशेने अॅक्टिवावरुन निघाल्या होत्या. पूजा रामचंद्र कुराडे (25) आणि करिश्मा उर्फ प्राजक्ता कळसे (27) अशी दोघींची नावं आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
दोघीजणी मलकापूरमधील डी मार्टमध्ये कामाला आहेत. येथील काम आटोपून त्या वाठार येथील आजारी सहकाऱ्याला पाहण्यासाठी दुचाकीवरुन जात होत्या. अघातग्रस्त मित्राला पाहण्यासाठी त्या रुग्णालयात जात असल्याची माहिती आहे. यावेळी ट्रकला ओव्हरटेक करीत असताना दुचाकी घसरली आणि त्या दोघीही ट्रकच्या चाकाखाली आल्या.
या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गाडीचं फारसं नुकसान झालेलं नाही. दुचाकी घसरल्यानंतर दोघीही ट्रकच्या दिशेने पडल्यामुळे त्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. दोघींच्या अपघाती मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे दुचाकीवरुन प्रवास करता ओव्हरटेक करू नये.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world