रेवती हिंगवे
पती-पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मात्र याच क्लास वन अधिकारी पतीने आपल्या क्लासवन अधिकारी असलेल्या पत्नी बरोबर जे काही केलं त्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. पतीने पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी घरातच स्पाय कॅमेरे लावले होते. ऐवढेच नाही त्या तिचे खाजगी क्षणाचे व्हिडीओ ही त्याने रेकॉर्ड करून ठेवले होते. तेवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने पत्नीचे आंघोळी करतानाचेही व्हिडीओ काढले होते. या माध्यमातून या क्लासवन अधिकाऱ्याने आपल्याच पत्नीच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. शिवाय हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून गाडी व कारच्या हप्त्याकरता दीड लाख रुपये आणण्याची जबरदस्ती करण्यात आली. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ही धक्कादायक घटना पुण्याच्या आंबेगावमध्ये घडली आहे. या प्रकरणातील क्लासवन अधिकारी असलेली महिला ही 30 वर्षाची आहे. पीडित पत्नीने आंबेगाव पोलिस ठाण्यात या छळाबाबत तक्रार दिली आहे. 2020 मध्ये पीडितेचे लग्न झाले होते. त्यानंतर सातत्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता असं तिने तक्रारीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे दोघेही सरकारी सेवेत क्लास 1 अधिकारी आहेत. तिचा पतीकडून तिच्यावर नेहमी संशय घेत होता. शिवाय सतत शिवीगाळ करून मानसिक त्रास ही देत होता.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
पण त्याने ती ही हद्द ओलांडली. पत्नीवर नजर ठेवण्यासाठी त्याने घरात गुप्त कॅमेरे बसवले. त्यातून त्याने पत्नीचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. शिवाय खाजगी क्षणाचे व्हिडिओ ही रेकॉर्ड करून ठेवले. या व्हिडीओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. हे व्हिडीओ व्हायरल करेन असं तो धमकी देत होता. त्या बदल्यात त्याने दीड लाख रुपये व कारचा हप्ता भरण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची सक्ती केली होती. लग्नानंतर सातत्याने छळ तिचा छळ सुरू होता. पण ती शांत राहीली. तिने कोणती ही तक्रार केली नाही.
तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शिवाय त्यातून मारहाण आणि अपमान ही सतत केला जात होता. मात्र व्हिडीओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने डोक्यावरून पाणी गेलं. शेवटी तिने हिंमत दाखवत पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात सासू, सासरे, दीर व इतर नातेवाईकांचा समावेश आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात संबंधित पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तांत्रिक पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि इतर तपशीलांची चौकशी केली जात आहे.