पेट्रोल चोरल्याचा संशय, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; पुण्यातील घटनेने खळबळ

तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का बसला असून त्याच्या वडिलांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पेट्रोल चोरीच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून नऱ्हे परिसरात एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. समर्थ भगत असं मृत्यू पडलेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत मृत तरुणाचे वडील नेताजी भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Bopdev Case Chargesheet : दोघांविरोधात आरोपपत्र दाखल, तिसरा आरोपी अद्याप फरार

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन आरोपी गौरव कुटे, अजिंक्य गांडले आणि राहुल लोहार  या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नऱ्हे येथील मानाजीनगर भागात 25 नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडला.  समर्थ भगत याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्याच्या दुचाकीतील पेट्रोल काढत होता. 

नक्की वाचा - ​​​​​​​एका महिलेला कपडे बदलताना पाहिलं, दुसरीने टेलरला भररस्त्यात धू धू धुतला; Video Viral 

त्यावेळी गौरव कुटे आणि त्याच्या इतर दोन-तीन साथीदारांनी समर्थला चोर समजून लाथाबुक्यांनी, काठी आणि सायकलच्या साखळीने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने समर्थला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

Advertisement