Pune Bribery Case: हद्दच केली! तब्बल 8,00,00,000 कोटींची लाच, दोघांना रंगेहाथ अटक, पुण्यात खळबळ

Pune Bribery Case News: दोन्ही आरोपींनी एकूण आठ कोटींची लाच मागितली होती. यांपैकी 30,00,000  (30, लाख रुपये) घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Bribery Case: पुण्यामध्ये  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वात मोठी कारवाई केली असून तब्बल आठ कोटींची लाच मागणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विनोद देशमुख (वय ५०), भास्कर पौळ (वय ५६) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी एकूण आठ कोटींची लाच मागितली होती. यांपैकी 30,00,000  (30, लाख रुपये) घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विश्वामनगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची 32 गुंठे सोसायटी जमीन पुण्यात कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आहे. ते 2005 नंतर या जमिनीची नवी 7/12 उतारा, नवीन नकाशे यासाठी तक्रारदार वारंवार सरकारी कार्यालयात पाठपुरावा करत होते. मात्र 2020 पासून तक्रारदारांचे काम काही केल्या होत नव्हते. हे काम करायचे असेल तर सरकारी अभिलेख विभागातील काही अधिकारी व मध्यस्थांमार्फत “लाच देणे गरजेचे आहे” अशी मागणी सुरू असल्याची तक्रारदारांना कल्पना दिली गेली.

Navi Mumbai Cyber Fraud: आरोही मिश्राची मैत्री पडली महागात, तब्बल 56 लाखांना लुटलं, नवी मुंबईत खळबळ

अलिकडे दोन आरोपींनी तक्रारदारांशी संपर्क साधून ८ कोटी रुपये दिले तरच जमीन नोंदणी व इतर कागदपत्रे मिळतील असे सांगितले. या वर्षी (2025) आरोपींनी तक्रारदारांच्या घरच्या सदस्यांकडेही संपर्क केला, त्यांना मानसिक त्रास दिला आणि पैशाची जोरदार मागणी केली. यामुळे कंटाळून तक्रारदारांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी ACB कडे तक्रार दिली.

30 लाखांची लाच घेताना अटक

या तक्रारीनंतर ACB ने  सत्यता तपासून  करून सापळा रचला. तक्रारदारांना आरोपींनी ३० लाख रुपये आणण्यास सांगितले होते. ५ डिसेंबर रोजी ठराविक ठिकाणी आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी तक्रारदाराकडून ३० लाख स्वीकारले. या वेळी ACB च्या टीमने दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींवर  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अन्वये लाच मागणे, लाच स्वीकारणे,  प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement