जाहिरात

Navi Mumbai Cyber Fraud: आरोही मिश्राची मैत्री पडली महागात, तब्बल 56 लाखांना लुटलं, नवी मुंबईत खळबळ

सुरुवातीला इंग्लिश संभाषण, हाय-प्रोफाईल भाषा शैली, आर्थिक तज्ज्ञ असल्याचा आव आणून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला.

Navi Mumbai Cyber Fraud: आरोही मिश्राची मैत्री पडली महागात, तब्बल 56 लाखांना लुटलं, नवी मुंबईत खळबळ

Navi Mumbai Cyber Fraud: सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना भुरळ घालणाऱ्या ऑनलाइन गुंतवणूक घोटाळ्यांचे प्रमाण नवी मुंबईत झपाट्याने वाढत आहे. अशाच एका गंभीर प्रकरणात तळोजा येथील ३७ वर्षीय पर्यावरण सल्लागार सुरज विलास यादव यांची तब्बल ₹56,27,410 इतकी फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादींच्या तक्रारीवरून नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवरुन संपर्क अन् फसवणूक...

समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज यादव यांच्याशी ‘आरोही मिश्रा' नावाच्या महिला प्रोफाइलमधून फेसबुकवर संपर्क साधण्यात आला. तिने फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे जलद आणि भरघोस नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला इंग्लिश संभाषण, हाय-प्रोफाईल भाषा शैली, आर्थिक तज्ज्ञ असल्याचा आव आणून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला.

Akola News : अकोल्यात सावकार मोकाट; पैसे परत देऊनही जमीन बळकावली, तरुणांनं उचललं टोकाचं पाऊल

फिर्यादींचा विश्वास बसताच त्यांना एका व्हॉट्सअॅप गुंतवणूक ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये ‘रमेश शर्मा' नावाच्या व्यक्तीमार्फत गुंतवणुकीसाठी विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले गेले. सुरुवातीच्या टप्प्यात काही व्यवहारांमध्ये कृत्रिमरीत्या नफा दाखवून फिर्यादींचा पूर्ण विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या निर्देशांनुसार टप्प्याटप्प्याने अनेक वेळा रक्कम जमा केली. अखेरीस एकूण ₹56.27 लाख इतकी रक्कम गुंतवणुकीच्या नावाखाली ट्रान्सफर करण्यात आली.

फिर्यादींना mingcoin-cloud या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावाने तब्बल ₹21.17 कोटी शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले. मोठ्या सायबर फसवणुकीची ही नेहमीची पद्धत असून, अशा प्लॅटफॉर्मवर खोटी शिल्लक दाखवून गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला जातो. मात्र, फिर्यादींनी ही शिल्लक रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन कारण देऊन व्यवहार नाकारण्यात आला. बराच प्रयत्न करूनही पैसे न मिळाल्याने आणि वेबसाइटवरील हालचाल संशयास्पद असल्याने हे संपूर्ण व्यवहार फसवणुकीचे असल्याचे स्पष्ट झाले.

गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरु...

फसवणुकीनंतर विविध मोबाईल क्रमांकांचे वापरकर्ते, खातेदार तसेच ‘mingcoin-cloud' या प्लॅटफॉर्मशी संबंधित ऑपरेटर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि अजित कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांकडून शाळा कॉलेज सोसायटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम अवरनेस केलं जात आहेत.

सेच नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक मोबाईल व्हाट्सअप स्टेटस वरती सायबर क्राईम जनजागृती यांचे व्हिडिओ बनवून ठेवले जात आहेत. नवी मुंबईत सायबर क्राईम कशा व कोणत्या पद्धतीचे असतात आणि ते तुम्हाला कशा प्रकारे गंडा घालू शकतात अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ सोशल माध्यमातून प्रसारित केले जात आहेत.

Mumbra Video: पोलिसांसमोरच टोईंग व्हॅनवरून बाईक खाली उतरवली; चूक कुणाची?

नवी मुंबईमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढत असल्याने नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणूक प्रस्तावांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणताही संशयास्पद व्यवहार, गुंतवणूक लिंक किंवा आर्थिक फसवणूक आढळल्यास सायबर हेल्पलाइन 112 किंवा नवी मुंबई नेरुळ सायबर पोलीस ठाण्यात तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com