Pune Crime : पुण्यात हॉटस्पॉट दिला नाही म्हणून हत्या; भररस्त्यात चेहरा छिन्नविछिन्न होईपर्यंत ठेचला!

हडपसर भागात मध्यरात्री घरासमोरील मुख्य रस्त्यावर शतपावली करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यात भररस्त्यावर राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुण्यातील हडपसर भागातून आणखी एक धक्कादायक (Pune Crime) घटना समोर आली आहे. हडपसर भागात मध्यरात्री घरासमोरील मुख्य रस्त्यावर शतपावली करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री दोन वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. (Murder for Hotspot)

वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय 46) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी कुलकर्णी यांच्याकडे वायफाय मागितले होते. मात्र त्यांनी देण्यास नकार दिला. या रागातून हल्लेखोरांनी कुलकर्णींचा चेहरा कोयत्याने वार करीत छिन्नविछिन्न होईपर्यंत वार केले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एक सज्ञान आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी मयूर भोसले (वय -20) याला अटक केली आहे. तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. हे तिघे अल्पवयीने असून 17 वर्षांचे आहेत.   

Advertisement

नक्की वाचा - 35 सेकंदात खेळ खल्लास, वनराज निवांत उभा होता अन्...; पुण्यातील गँगवॉरचा Live Video

त्या रात्री नेमकं काय घडलं?
मृत व्यक्ती वासुदेव कुलकर्णी हे हडपसर गाडीतळ येथील उत्कर्षनगर सोसायटीत राहतात. ते फायनान्स कंपनी आणि बँकांचे लोन करून देणाऱ्या एजंटचे काम करीत होते. सोमवारी रात्री साधारण दीड ते दोनच्या आसपास ते सोसायटीसमोरील पदपथावर शतपावली करीत होते. त्याचवेळी  चार मुलं रस्त्याने जात असताना त्यांनी कुलकर्णींकडे हॉटस्पॉट मागितला. मात्र अनोळख्या व्यक्तींना हॉटस्पॉट देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. नंतर मुलांनी त्यांच्याकडील धारदार कोयत्याने कुलकर्णी यांच्यावर वार केले. त्यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले आणि आरोपी फरार झाले. 

Advertisement

Advertisement