Pune Crime: गुंड गजा मारणेच्या व्हिडिओमुळे थेट जेलवारी, पुण्यात 4 विद्यार्थी अटकेत; प्रकरण काय?

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चार महाविद्यालयीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळत असून अल्पवयीन मुलेही गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. अशातच पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चार महाविद्यालयीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी कुख्यात गुंड गजा मारणे याचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करणाऱ्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक करून खंडणीविरोधी पथक दोनने कारवाई केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संबंधित विद्यार्थ्यांनी गजा मारणेच्या नावाने सोशल मीडियावर पुण्याचा किंग, किंग ऑफ महाराष्ट्र, बादशहा अशा प्रकारचे कॅप्शन लिहून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल केले होते. त्यांच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नक्की वाचा : बजेटची तारीख आणि वेळ का बदलण्यात आली? तुम्हाला माहिती आहे का कारण?

अक्षय निवृत्ती शिंदे ( वय- 19, रा.निमगाव खालू, श्रीगोंदा), सिद्धार्थ विवेकानंद जाधव (वय- 20,रा. मोहंमदवाडी),  साहिल शाहिल शेख ( वय- 19, रा. सुंबा, धाराशिव),  इरफान हसन शेख (वय- 19, रा. सुंबा, धाराशिव)  अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. सोशल मीडियाद्वारे व्हिडिओतून दहशत निर्माण करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. 

Advertisement

दरम्यान,  कुख्यात गुंड गजा मारणे याच्याही व्हिडिओचे इन्स्टाग्रामवर ग्लोरिफिकेशन केले जात होते. फॉलोअर्स वाढवण्यासाठी मारणेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून व्हिडिओतून दहशत निर्माण केली. किंग ऑफ पुणे, पुण्याचा बादशहा अशा कॅप्शनसह वाहनांचा ताफा, जमलेली गर्दी, चालत येऊन मारणेचा व्हिडिओ व्हायरल केला होता. धमकीवजा इशाऱ्याचे अनेक व्हिडिओ होते. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रशांत शिंदे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.