पुण्यात (Pune News) ड्रग्स तस्करीची वाढतं प्रमाण चिंता वाढवणारं आहे. पुण्यात मोठ्या संख्येने तरुणाई शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी येत असते. यादरम्यान पुण्यातून अमली पदार्थाचा साठा सापडल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहे. अशातच पुण्यातून दोन घटना समोर आल्या आहेत. पुण्यातील हडपसर परिसरातून मोठा अमली साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करीत पुण्यातून एक कोटी 15 लाख रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे.
8 लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थाविरोधी पथकाने छापेमारी करत तब्बल 8 लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत पुण्यात गांजा तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थान राज्यातून अमली पदार्थांची तस्करी करत पुण्यात आरोपी विक्री करत होते. राकेश अर्जुनदास रामावत, ताराचंद सिताराम जहांगीर, मुसीम सलीम शेख, महेश नारायण कळसे असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यातील हडपसर आणि खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थाची विक्री केली जात होती.
नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : विद्यादीप बालगृहात धर्मासाठी दबाव; पोलिसांच्या अहवालात धक्कादायक बाबी उघड
पुण्यात एक कोटी 15 लाख रुपयांची बनावट दारू जप्त
गोव्यातून तस्करी करुन आणण्यात येत असलेल्या 1 कोटी 15 लाखांच्या 57 हजार 792 बाटल्या दारु उत्पादन शुल्क विभागाने केल्या जप्त केल्या आहेत. जेजुरी सासवड रोडवरील वीर फाटा येथे केलेल्या कारवाईत सहा चाकी कंटेनरमधील तब्बल एक कोटींहून 1204 बॉक्समधील 57 हजार 792 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये कंटेनर, मोबाईल असा 1 कोटी 33 लाख 79 हजार 400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार अधीक्षक अतुल कानडे यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार 11 जुलै रोजी दुपारी चार वाजता सासवड येथील जेजुरी - सासवड रोडवरील वीर फाटा येथे सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी संशयित एलपीटी सहा चाकी कंटेनर वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीचा विदेशी दारुचा माल आढळून आला.