
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहात (Chhatrapati Sambhajinagar Vidyadeep Children's Home) अल्पवयीन मुलींच्या छळ प्रकरणी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. पावसाळी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा करण्यात आली. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देताच पोलीस प्रशासन कामाला लागले आहे.
दरम्यान विद्यादीप बालगृहातील विद्यार्थिनी छळ प्रकरणातील अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणातील सखोल चौकशी अहवाल लवकरच राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे. पोलिसांच्या अहवालात (Police Report) धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. बालगृहात विशिष्ट धर्माच्या प्रभावाखाली राहण्यासाठी दबाव टाकला जात होता.
नक्की वाचा - Nashik News : पत्नीचे दागिने विकून 55 लाख जमवले; सायबर फसवणुकीचा बळी ठरलेल्या कृषी अधिकाऱ्याची आत्महत्या
त्याशिवाय उपवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. बालगृहात मुलींचा छळ करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याशिवाय मुलींमध्ये भेदभाव झाल्याचा निष्कर्ष तपास समितीने अहवालात नमूद केला असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. काही मुलींचा जबाब हा पाठांतर केल्याप्रमाणे एकसुरी असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. तर बहुतांश मुलींनी चकार शब्दही काढ नाही. ही बाब गंभीर असल्याचे मतही अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world