देवा राखुंडे
होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता. मात्र मयुरीला सागर सोबत लग्न करायचं नसल्याने सागर कदम याला जिवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील नवरी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे.आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे,शिवाजी रामदास जरे,सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सागर जयसिंग कदम याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा सागर कदम हा हॉटेल कुक म्हणून काम करतो.
ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले
27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सागरला काही जणांनी रस्त्यात अडवून मारहाण केली होती. दौंड तालुक्यातील खामगाव फाटा नजीक यवत पोलिसांच्या हद्दीत ही मारहाण झाली. ज्या ठिकाणी ही मारहाण झाली त्या ठिकाणी एका हॉटेल ही होते. तिथेच सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती त्यांच्या हाती लागली.
ट्रेंडिंग बातमी - Chhatrapati Sambhajinagar : आईने रचला लेकाच्या हत्येचा कट, कारणही हादरवणारं!
यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे राहाणार अहिल्यानगर याला ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केलेची कबुली दिली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढऱ्या रंगाची चार चाकी कार देखील ताब्यात घेतली आहे. मयुरी दांगडे हिला सागर कदम सोबत लग्न करायचे नव्हते. म्हणून तिने 1 लाख 50 हजार रुपयांची सुपारी देऊन ही मारहाण घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत.