रेवती हिंगवे
आई ही आपल्या लेकीसाठी काही करायला तयार असते. आई आणि मुलीचं नाहीत हे जगातल्या कुठल्याही नात्या पेक्षा मोठं नातं आहे. असं असलं तरी या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. ही घटना ऐकल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. पुण्यात गेल्या काही दिवसात अशाच अप्रिय घटना घडत आहेत. त्यात आता या घटनेची भर पडत आहे. या प्रकरणात आईनेच आपल्या मुलीचे अश्लील व्हिडीओ काढले. शिवाय ते व्हायरल ही केले. त्यानंतर त्या मागचे कारण समोर येताच सर्वच जण हादरले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारती कुर्हाडे ही महिला आपल्या मुलीसह पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहात होती. ती 36 वर्षाची आहे. तिला 13 वर्षाची मुलगी आहे. या भारतीचे तिच्या पेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या गुरुदेव स्वामी याच्या बरोबर अनैतिक संबध होते. याची कुणकुण भारतीच्या मुलीला लागली. तिने याबाबत घरमालकीणीला सांगितले. मुलीच्या या कृतीचा राग भारतीच्या मनात होता. या रागातून तिने आपल्या अल्पवयीन मुलीचे धमकी देवून अश्लील व्हिडीओ काढले. ऐवढ्यावरच ती थांबली नाही. तिने आपल्याच मुलीचे ते अश्लील व्हिडीओ आपल्या बॉयफ्रेंडला पाठवले.
त्यातून मुलीवर दाबाव टाकत आपल्या बॉयफ्रेंडबरोबर अनैतिक संबध ठेवण्यास दबाव टाकला. शिवाय ते व्हिडीओ नातेवाईकांना पाठवण्याचीही धमकी दिली. तिचे नको ते व्हिडीओ व्हायरल करत या दोघांनी पळ काढला. त्यानंतर मुलीने बिबवेवाडी पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. गेल्या पाच महिन्या पासून मुलीचा आई आणि तिचा बॉयफ्रेंड फरार झाले होते. त्यानुसार पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली.
पुण्यातील खडकवासला परिसरात ते दोघे लपून बसले होते. त्याची माहिती पोलिसंना मिळाली. त्यानंतर सापळा रचून या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय पुण्यात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. गेल्या काही काळा पासून पुणे हे गुन्ह्याचे हब झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता या लाजीरवाण्या घटनेची भर पडली आहे.