Pune Thief : दुचाकी चोरून पुन्हा मालकाकडे, सोबत क्षमायाचनेची चिठ्ठीही; अजब चोर पाहून पोलिसही चाट! 

पुण्यात एक अनोख्या चोराची सध्या चर्चा आहे. या चोराच्या नावावर राज्यभरात 100 हून अधिक घरफोड्या, चोरी आणि दरोड्यांचे गुन्हे आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Crime : पुण्यात एक अनोख्या चोराची (Pune thief) सध्या चर्चा आहे. या चोराच्या नावावर राज्यभरात 100 हून अधिक घरफोड्या, चोरी आणि दरोड्यांचे गुन्हे आहेत. त्याने पोलिसांनाही आश्चर्यचकित केले आहे. त्याची कार्यपद्धती इतरांपेक्षा वेगळी असल्याने पोलिसांनाही चोर शोधणे कठीण जात होतं. हा पठ्ठ्या चोरलेली दुचाकी वापरत असे आणि नंतर काही दिवसांनी ती गाडी त्यांच्या मालकांकडे परत करत असे, तेही क्षमायाचनेच्या चिठ्ठीसह! शिवाजीनगर पोलिसांनी या चोराला अटक केलं असून त्याचं नाव हर्षद गुलाब पवार (वय 31) असं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 52 मोटारसायकली, दोन तलवारी आणि लॉक तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अनेक साधने जप्त करण्यात आली आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चोरीची अनोखी पद्धती...
हर्षद पवार चोरी केलेल्या दुचाकी शहरातून बाहेर जाण्यासाठी आणि गुन्हे करण्यासाठी वापरत होता. काही दिवसांनी तो त्याच ठिकाणी चोरलेल्या गाड्या परत ठेवत असे आणि सोबत एक चिठ्ठीही ठेवत असे, ज्यामध्ये तो लिहिले असे, 'तुमची गाडी परत केली आहे, कृपया लक्षात ठेवा.' कधी कधी तो प्रवासासाठी दुचाकी चोरून त्या गाड्या टोल नाक्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी सोडून द्यायचा.

नक्की वाचा - 13 हजार पगार, छत्रपती संभाजीनगरच्या घोटाळेबाजाकडे जगातला सगळ्यात महागडा गॉगल, किंमत ऐकून चक्कर येईल

गुप्तहेरांसारखी सावधगिरी...
विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये त्याची ओळख पटू नये यासाठी हर्षद पवार चोरी करताना हातमोजे आणि जॅकेट घालत असे. त्याच्याकडे तब्बल 50 वेगवेगळ्या प्रकारच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. ज्यामुळे तो कोणतंही कुलूप सहज तोडू शकत असे.

Advertisement

पोलिसांचा पवारला पकडण्यासाठी सापळा रचला. शेवटी शिवाजीनगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पवारचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर राज्यात 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो चोरीसाठी नाही तर प्रवासासाठी वाहनांचा वापर करायचा. त्याने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात चोरी आणि इतर गुन्हे केले आहेत. दरम्यान पोलिसांना चोरी झालेल्या दुचाकी मोठ्या प्रमाणावर परत मिळाल्या आहे. पोलिसांनी ती वाहनं त्यांच्या मालकांकडे परत केल्या आहेत. या घटनेनंतर वाहनमालकांमध्येही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलिसांनी हर्षद पवारकडून हस्तगत केलेल्या दुचाकी मालकांना परत करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.