सुरज कसबे, प्रतिनिधी:
Pune Crime Ayush Komkar Murder Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणाने पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकरला अखेर अटक करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणात एकूण 13 आरोपी होते त्यापैकी १२ आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर अद्याप फरार होता. अखेर त्यालाही अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर जवळपास संपूर्ण आंदेकर फॅमिलीच पोलिसांच्या ताब्यात असून गँगस्टर बंडू आंदेकरच्या फॅमिलीचे साम्राज्यच आता धोक्यात आले आहे. (Vanraj Andekar Murder Revenge Story)
कृष्णा आंदेकरला कसा पकडला?
आयुष कोमकर (Ayush Komkar) हत्या प्रकरणी पुन्हा पुण्यातील चर्चेत आलेली टोळी म्हणजे आंदेकर टोळीच्या चांगल्याच मुसक्या पुणे पोलिसांनी आवळलेल्या दिसत आहे. आयुष कोमकर प्रकरणी अटकेत असलेल्या ६ जणांची पोलीस कोठडी संपली होती त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आल होते. त्यामध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (Bandu Andekar) याने पोलिसांवर गंभीर आरोप केले.
Andekar Gang History: नाना पेठेत दहशत! टोळी प्रमुख ते राजकारण, आंदेकर गँगची डेंजर हिस्ट्री
बंडू आंदेकरचे नाक दाबले अन्...
“पोलिसांनी आम्हाला त्रास दिला आहे. गेल्या ३-४ दिवसापासून ब्रश किंवा अंघोळ करू दिली नाहीय. त्यासोबतच आम्हाला धमकी देत म्हणाले की कृष्णा आंदेकरला आमच्या समोर हजर होयला सांगा नाही तर आम्ही त्याला गोळ्या घालू.” दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने त्या सहा आरोपींना म्हणजेच बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, सुजल मेरगू, अमन पठाण 18 सप्टेंबर पर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे.
आंदेकर टोळीचे अवैध धंदेही उध्वस्त
या सगळ्या प्रकरणात आता सगळ्या आरोपींना अटक तर करण्यात आलीच आहे पण पहिल्या दिवसापासून पुजे पोलिसांनी एक इशारा दिला होता आणि तो म्हणजे की आंदेकर टोळीचे जे कुठले अवैद्य धंदे असतील किंवा अतिलरमण केलेल्या जमिनी असतील ते देखील रडारवर आहेत. तर या बद्दल कोणाला काही माहीत असेल तर त्यांनी देखील पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले होते. त्याचा अनुषंगाने पुणे पोलीस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने करवाई करत पाहिले आंडेकरच्या घराची झाडा झडती घेतली होती आणि त्या करवाईतून तब्बल ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
Pune Gangwar Inside story: आयुष कोमकरची हत्या टाळता आली असती, टीप मिळूनही पोलिसांचं काय चुकलं?
संपूर्ण आंदेकर फॅमिली जेलमध्ये
आयुष कोमकर याच्या हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी आंदेकर टोळीचा नायनाट करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे याप्रकरणी सध्या अख्खी आंदेकर फॅमिलीच (Andekar Toli जेलमध्ये आहे. बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, मित पाठोळे आणि सुजल मिरगू अशी आरोपींची नावे आहेत. त्यामुळे तब्बल चार दशकांचा रक्तरंजित इतिहास असलेल्या आंदेकर टोळीच्या साम्राज्याला हा मोठा हादरा मानला जात आहे.