जाहिरात

Pune Gangwar Inside story: आयुष कोमकरची हत्या टाळता आली असती, टीप मिळूनही पोलिसांचं काय चुकलं?

आधी पोलिसांच्या हाती एक महत्वाची टीप लागली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई केली असती तर आयुष याची हत्या टाळता आली असती.

Pune Gangwar Inside story: आयुष कोमकरची हत्या टाळता आली असती, टीप मिळूनही पोलिसांचं काय चुकलं?
पुणे:

आयुष कोमकरच्या हत्येने पुणे पुन्हा एकदा गँगवॉरच्या कचाट्यात आलं आहे. गणेश विसर्जनच्या आदल्या दिवशीच ही हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मुलाच्या बदल्यात मुलग्याची हत्या करण्यात आली. या मागे कौटुंबिक वाद असला तरी गँगवॉरची किनारही या मागे आहे. मात्र आयुषचा ज्या पद्धतीने खून झाला तो टाळता आला असता. कारण त्याचा खून होण्या आधी पोलिसांच्या हाती एक महत्वाची टीप लागली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई केली असती तर  आयुष याची हत्या टाळता आली असती. पण त्याकडे पोलिसांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. शेवटी आयुषला त्याचा जीव गमवावा लागला अशीच चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे. 

बरोबर एक वर्षापूर्वी 1  सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली होती. या हत्ये मागे गणेश कोमकर, सोम्या गायकवाड आणि अनिकेत दुधभाते हे होते. त्यातील गणेश कोमकर हा आंदेकरांचा जावई होता. तर सोम्या गायकवाड हा एके काळी आंदेकर गँगचाच सदस्य होता. हत्या झाल्यानंतर आम्ही काही करणार नाही असं वक्तव्य आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर याने सांगितलं होतं. त्यामुळे पुढे काही होणार नाही असं वाटत होतं. पण याच काळात पोलिसांची नजर आंदेकर कुटुंबियांवर होती. पण तशा कोणत्याही हालचाली दिसल्या नाहीत. आंदेकर गँगचा प्रत्येक जण रडारवर होता. पण त्यांच्या हालचाली तशा वाटत नव्हता. पण तसं नव्हतं. बदल्याची भावना आंदेकर गँग मध्ये होती. एक वर्षाच्या आता बदला घ्यायचा असा प्लॅन बंडू आंदेकरने केला होता. वनराजच्या वर्षश्राद्धा वेळीच हा बदला घेतला जाईल अशी रणनिती आखली गेली होती. त्यासाठी दत्ता काळे या तरुणाची निवड करण्यात येते. हा तरुण अत्याचाराच्या प्रकरणात येरवडा जेलमध्ये होता. 

नक्की वाचा - Andekar Gang History: नाना पेठेत दहशत! टोळी प्रमुख ते राजकारण, आंदेकर गँगची डेंजर हिस्ट्री

तो बाहेर आल्यानंतर त्याला आंदेकर गँग संपर्क करते. शिवाय वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याची निवड केल्याचे ही सांगते. सुरूवातीला आंदेकर गँगचं टार्गेट हे आयुश कोमकर नसतो. टार्गेटवर असतो सोम्या गायकवाड. त्यामुळे त्याची रेकी करण्यासाठी  दत्ता काळेला आंबेपठार इथं पाठवलं जातं. त्याला तिथे भाड्याची रूम ही दिली जाते. तो रेकी करून सर्व माहिती बंडू आंदेकरला पाठवतो. त्याच वेळी पोलिस खबऱ्याच्या नजरेत दत्ता काळे येतो. ही माहिती पोलिसांपर्यंत जाते. पोलिस तातडीने दत्ता काळे याला ताब्यात घेतात. त्याची चौकशी केली जाते. त्यात तो उडवाउडवीची उत्तरे देतो. मी या गावात राहात आहे असं तो सांगतो. पण संशय आल्याने त्याची सखोल चौकशी केली जाते. ही घटना ऑगस्ट महिन्याच्या शेवटी घडते. 

यात पोलिस तक्रार दाखल करता. या माध्यमातून एक गँगवॉर रोखल्याचा दावा आजच्या पत्रकार परिषदेत पुणे पोलिस आयुक्तांनी केली असली तरी तो तितका खरा ठरत नाही. त्याच वेळी जर पोलिसांनी हास आवळला असता आणि आंदेकर गँगच्या सुत्रधारांना पकडलं असतं तर पुढची घटना घडलीच नसती. पण तसं झालं नाही. पोलिसांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. त्यात पोलिस गणेश विसर्जनाच्या कामात व्यस्त झाले. तिच संधी आंदेकर गँगने साधली. प्लॅन ए फेल झाल्यावर प्लॅन बी त्यांच्याकडे तयार होता. त्यातूनच आंदेकर गँगने आयुष कोमकरला अतिषय निर्घुण पणे संपवले मुलाच्या हत्येचा बदला बंडू आंदेकरने गणेश कोमकरच्या मुलाची हत्या करून पुर्ण केला. पण पोलिसांकडे टीप होती. आरोपी ताब्यात होता. काय सुरू आहे याची कल्पना पोलिसांना होती. पण असं काही होईल याचा आंदाजच पोलिसंना आला नाही. तो वेळीच आला असता तर हे हत्याकांड झालं नसतं अशी चर्चा पुणे शहरात रंगली आहे. 

मामाची हत्या, भाच्याच्या खूनाने बदला! धडाधड 9 गोळ्या अन् घोषणा.. आयुष कोमकरला कसं संपवलं?

दरम्यान या हत्येनंतर पुण्यात चाललं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.  गँगवॉर फोफावत आहे. आंदेकर गँग काही तर करणार याचा आंदाज पोलिसांना कसा आला नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे  दहशतीचं वातावरण आहे. गेल्या वर्षी नगरसेवकर वनराज आंदेकर याची  हत्या करण्यात आली. त्यामुळे पुन्हा गँगवॉर होणार असं बोललं जात होतं. पण असं काही होणार नाही असं जाहीर पणे सांगून  बंडू आंदेकरने सर्वांनाच अंधारात ठेवलं. प्रत्यक्षात पडद्या मागे बदल्याची भावना होती. आणी कटही सिजत होता, तो ही पोलिसांच्या नाकावर टिचून. शेवटी त्याने करायचे ते केलेच. आयुष कोमकरला ठार मारलं.  त्याच्यावर  12 गोळ्या झाडल्या त्यातल्या 9 त्याला लागल्या. तो जागीच ठार झाला. त्यानंतर बंडू आंदेकर पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी त्याच्या कुटुंबीयांसह त्याला अटक करण्यात आली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com