बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, जीवाच्या आकांताने ओरडले पण... ; हिंजवडीतील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची सुन्न करणारी घटना

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, प्रतिनिधी

सकाळी 7.30 ची वेळ. ऑफिसला जायची लगबग सुरू होती. पुण्यातील हिंजवडी भागात कार्यालय असलेल्या योगा ग्राफिक्स अँड प्रिटिंग कंपनीचे कर्मचारी टेम्पो ट्रॅव्हलर बसमधून ऑफिसच्या दिशेने निघाले होते. सकाळी 8 वाजता ऑफिसची वेळ होती. मात्र त्याच वेळी काळाने घाला घातला आणि 12 पैकी 4 कर्मचाऱ्यांचा हकनाक बळी गेला.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्याच्या हिंजवडी भागात सकाळी 7.30 च्या दरम्यान एका टेम्पो ट्रॅव्हलर बसला भीषण आग लागली होती. या आगीत 4 बसमधील योमा ग्राफिक्स अँड प्रिंटिंग कंपनीचे कर्मचारी प्रवास करत होते. यातील चार कर्मचाऱ्यांचा जागीच होरपळून मृत्य झाला आहे. या बस अपघातात सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रदीप बाबुराव राऊत, विकास गोडसे,  मंजिरी अडकर, नंदकुमार सावंत, विठ्ठल दिघे, विश्वास लक्ष्मण खानविलकर हे जखमी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांवर हिंजवडी येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे बस अक्षरश: जळून खाक झाली आहे. बसच्या मागच्या बाजून कर्मचाऱ्यांचे काही अंशी जळालेले जेवणाचे डबे दिसत आहे. ऑफिसला जायला निघालेल्या या कर्मचाऱ्यांना अचानक मृत्यूने गाठलं. काहींच्या माहितीनुसार ते मागच्या दारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र काही सेकंदात बस धडाधड पेटू लागली. त्यामुळे या चौघांना बाहेर निघता आलं नाही. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Hinjewadi Bus Fire : पुण्यातील हिंजवडीत बसला भीषण आग; 8 जण बचावले..., 4 प्रवासी जळून खाक!

बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज प्राथमिक रित्या दर्शवला जात आहे. मात्र याबाबत प्रत्यक्ष परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि फॉरेन्सिकचे अधिकारी तपासणी केल्यानंतर खरं कारण समोर येईल असं उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलं आहे. प्रथम दर्शनी ही गाडी योमा ग्राफिक्स अँड प्रिंटिंग कंपनीच्या नावे असून तिचे योग्यता प्रमाणपत्र देखील चालू वर्षाचे आहे. गाडीची नोंदणी देखील 2015 साली करण्यात आली होती, ही कर देखील भरला होता. याबाबत आम्ही तपासणी करत असल्याचं परिवहन विभागाने म्हटलं आहे.

Advertisement