जाहिरात

Hinjewadi Bus Fire : पुण्यातील हिंजवडीत बसला भीषण आग; 8 जण बचावले..., 4 प्रवासी जळून खाक!

ऑफिसला जात असताना बसला अचानक आग लागल्याने 4 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Hinjewadi Bus Fire : पुण्यातील हिंजवडीत बसला भीषण आग; 8 जण बचावले..., 4 प्रवासी जळून खाक!

Hinjewadi Bus Fire : पुण्यातील हिंजवडी भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टेम्पो ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याने चार जणं जळून खाक झाल्याची माहिती आहे. या घटनेचे अंगावर काटा आणणारे दृश्यही समोर आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज एक रोडवर व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल (MH14 CW 3548) बसला अचानक आग लागली होती. यावेळी बसमध्ये बारा प्रवासी होते. आग लागताच त्यातील 8 जणांनी बसच्या बाहेर सुखरुप आले. मात्र चार जण बसमध्ये होरपळले. या चौघांचाही यात मृत्यू झाला आहे. हे कर्मचारी व्योमा ग्राफिक्स कंपनीचे असून ते ऑफिसला जात असल्याचं सांगितलं जात आहे.

Drugs Smuggling : पाकिस्तानातून ड्रोनने मागवायचा ड्रग्ज, ठिकाणही ठरलेलं; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

नक्की वाचा - Drugs Smuggling : पाकिस्तानातून ड्रोनने मागवायचा ड्रग्ज, ठिकाणही ठरलेलं; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

त्यादरम्यान बसला अचानक आग लागल्याने हा प्रकार घडल्याची माहिती आहे. टॅम्पो ट्रॅव्हलची बस असल्याने सर्वांना एकाच वेळी बाहेर निघणं शक्य झालं नाही. त्यामुळे ८ जणं बाहेर पडू शकले मात्र चार जणं बसमध्येच अडकले. या जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. अद्याप आगीचं कारण कळू शकलेलं नाही. तरी पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: