राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं पोर्शे कार चालवत दोन जणांना चिरडलं. दोन जणांचा जीव घेणाऱ्या या अल्पवयीन मुलाला सुरुवातीला अटक न करता 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणातील निर्णयानं धक्का बसला अशी कबुली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली होती. अल्पवयीन मुलाचे आई-वडील तसंच आजोबांना या प्रकरणात अटक झाली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणानंतर तब्बल 47 दिवसांनी अल्पवयीन आरोपीने 300 शब्दांचा निबंध बालहक्क मंडळाकडं सादर केला आहे. या निबंधामध्ये त्यानं प्रत्येकानं सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचं महत्त्व सांगितलंय.
या अपघातानंतर तो घाबरला होता. भीतीमुळे पोलिसांना माहिती दिली नाही, असं त्यानं या निबंधात लिहलं आहे. लोकांनी वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे. अपघात झाला तर घटनास्थळावरुन पळून न जाता थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावं. पळून जाणं त्यांना अडचणीत आणू शकतं, असंही त्यानं निबंधात लिहलंय. त्याचबरोबर अपघातग्रस्तांना मदत करावी, असं आवाहनही त्यानं केलं आहे.
( नक्की वाचा : बाबाच्या खोलीत फक्त मुलींना होता प्रवेश! पांढरे कपडे घालणाऱ्या नारायण साकारचे वाचा रहस्य )
अल्पवयीन आरोपीचा हा निबंध अधिकाऱ्यांना अस्पष्ट वाटला. या निबंधावरुन त्याच्या मानसिक स्थितीचा न्याय करु शकत नाही, असं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तो कोठडीत असताना आत्मविश्वासानं वागला. त्याच्या पालकांना एकापाठोपाठ अटक झाली त्यावेळी तो घाबरला आणि तणावग्रस्त झाला, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना निबंध अस्पष्ट वाटला आणि ते म्हणाले की ते यावरून अल्पवयीन व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा न्याय करू शकत नाहीत. त्याच्या वर्षांपेक्षा मोठा दिसत होता आणि कोठडीत असताना आत्मविश्वासाने वागला, जरी त्याच्या पालकांना एक-एक करून अटक करण्यात आली तेव्हा अपघातानंतर तो घाबरला आणि तणावग्रस्त झाला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world