जाहिरात

Pune News: नवले पूल की मृत्यूचा सापळा? पुण्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, 3 जण रक्ताच्या थारोळ्यात

Pune News: पुण्यातील नवले पुलावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. नवले पुलावर नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Pune News: नवले पूल की मृत्यूचा सापळा? पुण्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, 3 जण रक्ताच्या थारोळ्यात
"Pune Navale Bridge Accident: नवले पुलावर भीषण अपघात"
NDTV Marathi

- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी

Pune News: पुण्यातील अपघातांचा 'ब्लॅक स्पॉट' ठरलेल्या नवले पुलावर गुरुवारी (12 मार्च) पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये कार उलटून मोठा अपघात झाला. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवले पुलावरील नेमकी घटना काय? | Navale Bridge Accident 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवले पुलावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरच उलटली. या भीषण अपघातात कारचे नुकसान झालं आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारमधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

(नक्की वाचा: Heatwave Alert: सावधान! पुणे मुंबईसह राज्याचा पारा 40 पार; उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये?)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

पोलीस घटनास्थळी दाखल

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com