सूरज कसबे
केतन अग्रवाल आपली होणारी पत्नी सिया गोयलवर जिवापाड प्रेम करत होता. तिला प्रत्येक क्षणी कसं आनंदी ठेवता येईल यासाठी तो काळजी घेत होता. तिला काही कमी पडणार नाही याकडे त्याचं लक्ष असायचं. लग्न म्हणजे एक नवी सुरूवात ती कशी चांगली होईल. दोघांचं नात आणखी किती घट्ट होईल. याकडे त्याचा कटाक्ष होता. म्हणून सियाच्या वाढदिवसाच्या एक महिना आधीच वर्थ डे काऊंडाऊन सुरू झालं होतं. त्यासाठी खास क्षण दोघांनी एकमेकांसोबत घालवले होते. त्याच वेळी सियाला केतनने एक सरप्राईज ही दिलं होतं. विशेष म्हणजे याचा व्हिडीओ सियाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ही ठेवला होता.
त्या दोघांचा हा व्हिडीओ पाहाता सिया असं काही केतन सोबत करेल असं कुणाला स्वप्नातही वाटणार नाही. हा व्हिडीओ 18 मे चा आहे. त्याच दिवशी सियाने इन्स्टाग्रामवर एक बर्थडे काउंटडाउन स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये केतनने तिला खुश करण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. शिवाय दोघ ही अथांग प्रेमात बुडालेले दिसत आहे. सुरूवातील केतन तिला आपल्या अलिशान कारमध्ये बसवतो. तो तिला डोळे बंद करायला सांगतो. त्यानंतर तो तिला एक फुल देतो. डोळे उघडल्यावर सिया खुश होते. आनंदाने हसते. मग तो गाडीचं सनरुफ उघतो. तिथे तिच्या आवडीची फुलं ठेवलेली असतात.
ते पाहून तर सियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती आनंदाच्या भरात केतनला मिठी मारते. त्यानंतर हे दोघे एका रेस्टॉरंटमध्ये जातात. तिथे सियासाठी खास म्युझिक वाजवले जाते. समोर केक ठेवलेला असतो. सियाला तो ढोपरावर बसून तिला गुलाबाचं फुल देतो. त्यानंतर ते तिथं डान्स ही करतात. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा आहे. पण सियाच्या या गोड चेहऱ्याच्या मागे एक शैतान लपलेला आहे याची कल्पना ही घटना उघड झाल्यानंतर समोर आली आहे. हे सर्व ती केतनचा विश्वास संपादीत करण्यासाठी करत होती की काय असा संशय घ्यायला वाव आहे. त्यामुळेच ती प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत खूश असल्याचं दाखवत आहे.
सियाने जणू केसाने गळा कापला आहे. हा व्हिडीओ पाहील्यानंतर जगाला त्यांचे नाते आदर्श वाटत असतानाच पडद्यामागे मात्र एका निष्पाप जिवाचा बळी घेण्याचा भयानक कट शिजत होता. ज्यामुळे सध्या परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान केतनच्या मृत्यूनंतर सियाने आणखी एक बनाव रचला होता. बरोबर एक महिन्यानंतर म्हणजे 17 जूनला केतनची हत्या झाली. या घटनेनंतर मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले होते, "तू मला माझ्या वाढदिवशीच सोडून गेलास. आपल्या लग्नाला काहीच महिने उरले होते. तू माझ्यासोबत असं का केलंस? माझं हृदय सांगतंय की तू इथेच आहेस, परत ये." या सोबत तिने तो जुना व्हिडीओ शेअर केला होता. तो आता व्हायरल होत आहे.