जाहिरात

Pune: दुर्घटना नव्हे हत्या! होणाऱ्या पत्नीनेच केतनला लोहगडावरून दरीत ढकललं, पोलिसांना संशय, कारण काय?

Pune Crime News: लोणावळ्याजवळील लोहगडावर फोटोसाठी पोझ देताना तोल जाऊन दरीत पडल्याने झालेला केतन विशाल अग्रवालचा मृत्यू हा अपघात नसून हत्या असल्याचा धक्कादायक खुलासा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केला आहे.

Pune: दुर्घटना नव्हे हत्या! होणाऱ्या पत्नीनेच केतनला लोहगडावरून दरीत ढकललं, पोलिसांना संशय, कारण काय?

सुरज कसबे, पुणे

ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या केतन विशाल अग्रवाल याचा दरीत कोसळून झालेला मृत्यू झाला होता. दुर्घटनेबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ही निव्वळ दुर्घटना नसून, एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचा संशयास्पद खुलासा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केला आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून अपघात झाल्याचा बनाव समोर आला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच धक्का दिल्याचा संशय आहे.

अपघाताचा बनाव फसला

घटनेच्या दिवशी केतन अग्रवाल त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर फिरण्यासाठी गेला होता. किल्ल्याच्या एका धोकादायक कड्यावर फोटोसाठी पोझ देत असताना केतन याचा तोल गेला आणि ते थेट खोल दरीत कोसळला, अशी माहिती सुरुवातीला दिली गेली होती.

(नक्की वाचा-  Pune News : सह्याद्रीच्या कुशीत सेलिब्रेशन; भयंकर घडलं अन् वाढदिवशीच निघाली अंत्ययात्रा!)

परंतु, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी आणि तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला असता, पोलिसांचा संशय बळावला. घटनेच्या वेळी केतन याच्या अत्यंत जवळ असलेल्या त्याच्या होणाऱ्या भावी पत्नीनेच त्याला मागून जोराचा धक्का देऊन दरीत ढकलून दिले असावे, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

(नक्की वाचा-  Pune News: पाणीटंचाईमुळे पाण्याचे दुर्भिक्ष! त्यात नवी अडचण, पुणेकरांचं टेन्शन वाढलं)

नेमक्या कोणत्या कारणातून केली हत्या? 

सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाला आता हत्येचे वळण लागल्याने संपूर्ण पुणे आणि लोणावळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. "याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. होणाऱ्या पत्नीने नेमक्या कोणत्या वादातून किंवा कारणातून केतन यांना दरीत ढकलले, तसेच या संपूर्ण कटात तिचा कोणी प्रियकर किंवा आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत."

पोलीस आता आरोपीची कसून चौकशी करत असून, केतन आणि तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) देखील तपासले जात आहेत. लवकरच या हत्येमागील मुख्य कारणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com