पुणे: कोथरुड पोलिसांकडून तीन मुलींना मारहाण केल्याचा, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपांनी पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत पिडीत मुलींनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. मात्र 12 तासांपासून अधिककाळ त्यांच्या मागणीची दाद घेतली जात नसल्याचे समोर आहे. याठिकाणी वंचितचे नेते सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, तसेच तक्रार घेण्यासाठी ठिय्या आंदोलनही केले.
Kalyan News: धावत्या ट्रेनमध्ये फटका मारला, तरुण थेट रूळावर कोसळला, पाय गमावला अन्...
छत्रपती संभाजीनगरमधील एक विवाहित महिला पतीच्या जाचाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या पिडीत मुलीला मदत केल्याने तीन सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या मुलींना पोलिसांनी कोणतीही सूचना न देता ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्थानकात मारहाण, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. याविरोधात मुलींची तक्रारही घेतली जात नसल्याचे समोर आले असून रविवारी तब्बल 12 तास या मुलींना बसवून ठेवण्यात आले.
या प्रकारानंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पिडीतांची भेट घेतली. या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला पोलीस संजीवनी शिंदे यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मात्र तरुणींची तक्रार घेतली जात नसल्याने सर्वांनीच ठिय्या आंदोलन केले.
पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अट्रोसिटी कायद्याचे महत्त्व, पीडित महिलांचा त्रास समजत नाहीये. गेल्या 15 तासांपासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात एफआयआर नोंदवावी म्हणून लढताय. तरीसुद्धा पोलिस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही. पोलिसांना एवढी भीती कशाची? पोलिस आरोपींना पाठीशी का घालताय? सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतांना पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालताय? असे सवाल वंचित आघाडीने उपस्थित केले आहेत.