रेवती हिंगवे, पुणे: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, मारामारी, खूनाच्या घटना काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे कोयता गँगच्या दहशतीमुळे नागरिकांंमध्ये भितीचे वातावरण पसरले असतानाच आता पुण्यात पोलीस तरी आहेत का? असा सवाल उपस्थित करणारी घटना घडली आहे. गस्तीवर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पुण्यातील खडकी भागात मारहाण झाल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गाडी वेगात चालवल्याचा जाब विचारल्यामुळे टोळक्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे अशी जखमी झालेल्या पोलिस शिपायांची नावे आहेत. शहरातील खडकी भागात घडलेल्या या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी 4 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
पतीचा विकृत कारनामा! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले, ब्लॅकमेल करत डान्सबारमध्ये नाचवले, पुढे...
हा सगळा प्रकार काल रात्री ९ वाजता पुणे-मुंबई महामार्गावर खडकी भागात घडला. रात्री खडकी भागात गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर चार जणांच्या टोळीने हल्ला केला. एक दुचाकीस्वार त्याची मोटार बाईक वेगात आणि वेडीवाकडी चालवत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आल्याने त्याबाबत कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारणा केली.
यावरून दुसऱ्या मोटरबाईक वरून आलेल्या त्यांच्या मित्रांनी सुद्धा पोलिसांशी वाद घालायला सुरवात केली. संतप्त झालेल्या चार जणांनी यावेळी पोलिसांवर अचानक हल्ला केला जुनेद इक्बाल शेख (वय 27), नफीज नौशाद शेख (वय 25), युनूस युसुफ शेख (वय 25), आरिफ अक्रम शेख (वय 25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Nashik Crime : 75 गुन्ह्यातील चेन स्नॅचरवर धाडसी नणंद-भावजयीची झडप, मंगळसूत्र चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद